राष्टÑपतींच्या हेलिपॅडसाठी जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:55 PM2018-10-09T23:55:54+5:302018-10-09T23:57:36+5:30

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टÑपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिकाºयांनी तळ ठोकला आहे.

Looking for space for the nation's helipad | राष्टÑपतींच्या हेलिपॅडसाठी जागेचा शोध सुरू

राष्टÑपतींच्या हेलिपॅडसाठी जागेचा शोध सुरू

Next
ठळक मुद्देमांगीतुंगी सोहळा : शासकीय यंत्रणेची धावपळ

नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून, मांगीतुंगी येथे राष्टÑपतींच्या पाच हेलिकॉप्टरसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिकाºयांनी तळ ठोकला आहे.
दोन वर्षांपूर्वी मांगीतुंगी पर्वतावर अखंड दगडावर जैन धर्मीयांचे आद्य भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट मूर्तीचे निर्माण करण्यात येऊन महामस्ताभिषेक सोहळा पार पडला होता. जैन साध्वी ज्ञानमती माताजी यांनी २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन केले आहे. ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरने राष्टÑपती मांगीतुंगी येथे जाणार असले तरी, मांगीतुंगी येथे हेलिपॅडसाठी १२ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
व्यवस्थेबाबत सूचना
राज्यपाल, मुख्यमंत्रींसह अन्य मंत्रीही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनासाठी वाहनतळासाठी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मांगीतुंगी येथे पाहणी केली तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.

Web Title: Looking for space for the nation's helipad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.