उबदार जागेच्या शोधात साप येताहेत घरांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:04 AM2018-07-17T01:04:26+5:302018-07-17T01:05:09+5:30

पावसाळ्यात सर्प बिळं सोडून उबदार जागेच्या शोधात भटकंती करताना दिसतात; खरं तर हा हंगाम त्यांना बेघर करणारा असतो; त्यामुळे उबदार जागेच्या शोधार्थ सर्प अनेकदा नागरिकांच्या घरांतही येण्याच्या घटना घडतात. सोमवारी (दि.१६) जागतिक सर्प दिनाच्या दिवशी वन्यजीव संवर्धन करणाऱ्या संस्थेने सहा सर्पांना रहिवाशांच्या घरांमधून ‘रेस्क्यू’ करत जीवदान दिले.

 Looking for a warm place to find snakes in the house | उबदार जागेच्या शोधात साप येताहेत घरांत

उबदार जागेच्या शोधात साप येताहेत घरांत

Next

नाशिक : पावसाळ्यात सर्प बिळं सोडून उबदार जागेच्या शोधात भटकंती करताना दिसतात; खरं तर हा हंगाम त्यांना बेघर करणारा असतो; त्यामुळे उबदार जागेच्या शोधार्थ सर्प अनेकदा नागरिकांच्या घरांतही येण्याच्या घटना घडतात. सोमवारी (दि.१६) जागतिक सर्प दिनाच्या दिवशी वन्यजीव संवर्धन करणाऱ्या संस्थेने सहा सर्पांना रहिवाशांच्या घरांमधून ‘रेस्क्यू’ करत जीवदान दिले.  निसर्गाचे संतुलन राखणारा उभयचर प्राणी असलेल्या सर्पाचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे; मात्र सर्प हा सरपटणारा व विषारी प्राणी असल्याने नागरिकांमध्ये त्याची भीती आहे. यामुळे सर्पांविषयी सर्वसामान्यांकडून संवर्धनाबाबत दुर्लक्ष होते. पावसाळ्यात सर्प बेघर होत असल्यामुळे रस्त्यावर येतात आणि वाहनांखाली चिरडले जातात. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा डांबरी रस्त्यांवर किंवा रस्त्याच्याक डेला सर्प मेलेल्या अवस्थेत नजरेस पडतात. वाहनांचा धोका टाळण्यासाठी काही सर्प नागरिकांच्या घरांमध्ये किंवा संरक्षक भिंतींच्या कुंपणाच्या आतमधील बाजूस अडगळीच्या ठिकाणी शिरून बसतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.  मोरवाडीत एका घरात हरणटोळ, दुस-या एका सिडकोतील घरामधील चप्पलांच्या रॅकमध्ये असलेल्या बुटातून धामण या बिनविषारी सर्पाला इको-एको फाउंडेशनच्या वन्यजीव सेवकांनी यशस्वीरीत्या रेस्क्यू क रून निसर्गात मुक्त केले. तसेच अन्य दोन घरांमध्ये शिरलेले सर्पही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यास स्वयंसेवकांना यश आले. घराच्या परिसरातून बाहेर काढून द्यावे, अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळल्यास तत्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री मदतवाहिनीवर संपर्क साधावा, असे त्या म्हणाल्या. सर्पाला धोक्याची चाहूल होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेत सर्प रेस्क्यू करेपर्यंत संयम बाळगणे गरजेचे असल्याचे इको-एको फाउंडेशनचे अभिजित महाले यांनी सांगितले.

Web Title:  Looking for a warm place to find snakes in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक