आभाळ पडनं....ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी...आते आम्ही जगानं कसं.?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:29 PM2019-11-06T13:29:59+5:302019-11-06T13:30:17+5:30
सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा बळीराजा यंदा आपल्या कुटुंबात लक्ष्मी नांदेल आणि सर्व अंधार दिवाळीने उजळून निघेल ही स्वप्न बघत असतांना यावर आभाळच कोसळलं..आणि बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फिरलं ....सर्व काही उद्ध्वस्त झाले .
सटाणा : शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेल्या द्राक्ष पिकाचे शंभर ,सव्वाशे रु पयांनी सौदे झालेले .....डाळिंब देखील बांधावर शंभर रु पये किलोने विकले जात होते .मका ,बाजरी,सोयाबीन ,भात ,नागली ,भुईमुग काढणीवर आलेले पिक पाहून गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा बळीराजा यंदा आपल्या कुटुंबात लक्ष्मी नांदेल आणि सर्व अंधार दिवाळीने उजळून निघेल ही स्वप्न बघत असतांना यावर आभाळच कोसळलं..आणि बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फिरलं ....सर्व काही उद्ध्वस्त झाले .कर्ज काढून पोटच्या गोळ्या सारख पिकविलेल सोन डोळ्या देखत गेल्याचे पाहून ‘आभाळ पडनं..ऐन दिवाळीमा लक्ष्मी गयी..आते आम्ही जगानं कसे ..?’असा हंबरडा फोडला तर अनेकांच्या डोळ्यातील अश्रूच आटले असल्याचे भयावह वास्तव चित्र परतीच्या पावसाने आज बागलाणमध्ये बघायला मिळत आहे.
बागलाण तालुक्यात ऐन दिवाळीत आभाळच कोसळलं. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शाल ,सत्कार न स्वीकारता आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नेते , पुढारी आणि शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली .तत्पूर्वी बोरसे यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी पहिल्याच दिवसी साडे आठशे हेक्टर द्राक्ष बागांचे पंचनामे पूर्ण केले. शासकीय यंत्रणा कामाला लागल्यामुळे बागलाण पंचनामे करण्यात अव्वल ठरला असला तरी मदतीचे काय असा सवाल आता बळीराजा करत असल्याचे बघायला मिळत आहे .बागलाण तालुक्यात सुमारे दोन हजार ५६ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिक पूर्णपणे बाधित झाले आहे .११२७ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब पिक बाधित झाले आहे .नागली ४२ हेक्टर ,भात ७३५ हेक्टर ,बाजरी ५ हजार २४८ हेक्टर ,सोयाबीन ९८६ हेक्टर ,भुईमुग २१ हेक्टर ,मका २१ हजार ३५२ हेक्टर ,कापूस ६५ हेक्टर , भाजीपाला २१० हेक्टर असे एकूण ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील ५३ हजार ३०४ शेतकºयांचे पिक बाधित होऊन नुकसान झाले आहे .याचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले .
--------------------------
पाच ते सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प......
बागलाण हा द्राक्ष हंगामासाठी प्रसिद्ध टापू आहे.या भागाचे मुख्य पिक डाळिंब असले तरी तेल्या रोगामुळे डाळिंब पिकाला भवितव्य नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी डाळींब पिकाला पर्याय म्हणून द्राक्ष पिकाला पसंती दिली आहे .त्यामुळे साहजिकच डाळिंब पिकाची जागा द्राक्षाने घेतली आहे.उच्च शिक्षण घेऊनही नोकºया नसल्यामुळे अनेक तरु णांनी नोकरीची वाट न पाहता व्यावसायिक शेतीत रमणे पसंत केले.कर्ज काढून द्राक्ष बागा उभ्या केल्या .अनेक धोके झेलत निर्यातक्षम अर्ली द्राक्ष पिक काढले .यामुळे दरवर्षी सुमारे दहा हजार कोटी रु पयांची उलाढाल एकट्या बागलाण मधून होते .यामुळे देशाला परकीय चलन देखील मिळते .यंदा मात्र परतीच्या पावसाने द्राक्षाचे शिवाराच उद्धवस्त झाले .एकरी अडीच लाख रु पये भांडवल टाकून सुमारे साडे सातशे तरु ण शेतकर्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकविले होते .अनेकांनी शंभर , सव्वाशे ,दीडशे रु पयांनी सौदे देखील केले होते .मात्र रात्रीतून आभाळ कोसळलं आणि होत्याच नव्हत झाला .यंदा या अस्मानी संकटामुळे तब्बल पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प होऊन देश परकीय चलनाला मुकणार आहे .