चाकुचा धाक दाखवू लुट; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:57 PM2017-12-05T15:57:07+5:302017-12-05T15:57:20+5:30
लासलगाव : मंगळवारी पहाटे साडे बारा विजेच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगुर येथील क्वॉलीस गाडीवर दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवीत एकोणचाळीसशे रूपयांची लुट करणाºया पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
लासलगाव : मंगळवारी पहाटे साडे बारा विजेच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगुर येथील क्वॉलीस गाडीवर दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवीत एकोणचाळीसशे रूपयांची लुट करणाºया पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
औरंगाबाद येथुन संदल करून भगुर किराणा व्यवसायिक फारूक अमीन शेख (५५) हे आपल्या इतर चार नातेवाईकांना सोबत घेऊन भंगुर येथे निघाले असता रात्री बारा विजेच्या सुमारास डिझेल संपले. डिझेल संपल्यानंतर औरंगाबाद हमरस्त्यावर लासलगाव पोलीस कार्यालयाचे हद्दीतील भरवस फाटा परिसरातील पाटीलवाडा या हॉटेलसहजवळ उभी करून चालक गाडीतील एकासह डिझेल आणण्यास गेले असता एम एच १५ बी डब्ल्यू ५६६९ या गाडीवर दरोडा टाकीत मोटार सायकल वरून आलेल्या पाच जणांनी १९०० रूपये रोख व नोकिया व सॅमसॅग कंपनीचे दोन हजार रूपयांची मोबाईल व आतील आयडीया व टाटा डोकॅमो कंपनीचे सिमकार्ड यांची लुट करीत फरारी झाले. या दरम्यान सचिन जाधव या तरूणाने मदतीला येउन प्रतिकार केला असता टाकु हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे अवघ्या पंधरा मिनीटात पोलिस जीपने पोहचले. लूट करणाºयांची माहिती घेऊन पाठलाग सुरू केला असता विंचुर येथील एमआयडीसीजवळ हिरो होंडा मोटारसायकल नेमप्लेटला चिखल लावुन चाललेल्या गाडी क्रमांकएमएच १७एएक्स ३७४९ या सह पाचशे पन्नास रूपये व सॅमसॅग कंपनीचा मोबाईल व मोटार सायकल जप्त करून राजेश भानुदास अभंगेवय (२४) रा खिल्ली गणेश ता .कोपरगाव, जिल्हा.अहमदनगर व आकाश भाऊसाहेब म्हस्के (२०) रा.खिर्डी गणेश ता . कोपरगाव यांना ताब्यात घेतले असता इतर साथीदार यांची माहिती घेऊन कृष्णा दिलीप लोंढे (२२) रा .खिल्लारी वस्ती ब्राम्हणगाव (ता. कोपरगाव) व शुभम सुरेश वाभुळ (२१) रा. ब्राह्मणगाव रोड, येसगाव (ता.कोपरगाव,जि.अहमदनगर ) यांना लागलीच येसगाव येथुन पोलिस पथकाने पकडले.