भगूरमधील कापड दुकानात चोरी,पाऊण लाखाचे कपडे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:44 PM2017-11-06T16:44:23+5:302017-11-06T17:16:57+5:30

दुकानातील ४० जीन्स पॅन्ट, ४० शर्ट, ५० टी-शर्ट, १२ कॅपशर्ट, थंडीचे ४० जॅकेट, असा ६३ हजार रुपयांचे कपडे चोरून नेले.

Looted clothes in Bhagur's shop, robbery | भगूरमधील कापड दुकानात चोरी,पाऊण लाखाचे कपडे लंपास

भगूरमधील कापड दुकानात चोरी,पाऊण लाखाचे कपडे लंपास

Next


नाशिक : कपड्याच्या दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकून चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचे कपडे लंपास चोरून नेल्याची घटना भगूर-पाथर्डी रोड परिसरात घडली आहे़
अमोल अशोक लकारिया (रा. भगूर) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, त्यांचे भगूर-पांढुर्ली रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये रेडिमेड कपड्याचे दुकान आहे. शनिवारी (दि़४) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला़ तसेच दुकानातील ४० जीन्स पॅन्ट, ४० शर्ट, ५० टी-शर्ट, १२ कॅपशर्ट, थंडीचे ४० जॅकेट, असा ६३ हजार रुपयांचे कपडे चोरून नेले.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Looted clothes in Bhagur's shop, robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.