नाशिककरांनी लुटले ‘सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:37 AM2018-10-19T00:37:52+5:302018-10-19T00:38:09+5:30

आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला.

Looted 'gold' by Nashik | नाशिककरांनी लुटले ‘सोने’

नाशिककरांनी लुटले ‘सोने’

googlenewsNext
ठळक मुद्देसीमोल्लंघन : मिरवणूक, महाप्रसाद, आपट्याच्या सोन्याची लयलूट

नाशिक : आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला.
नवरात्रीच्या नऊ दिवस शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नवदुर्गांच्या पूजनादरम्यान रंगलेल्या दांडिया आणि गरबा महोत्सवाच्या सांगतेबरोबरच विजयादशमीच्या दिवशी नाशिककरांनी घटांचे विसर्जन करीत सीमोल्लंघन केले. गेल्या नऊ दिवसांत शहरातील ग्रामदेवता कालिका देवी उत्सवासोबतच सांडव्यावरची देवी, भद्रकाली देवीची भक्तिभावाने पूजा केली. सिडको, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड परिसरातही नवरात्रोत्सवात तरुणाईचा आनंद शिगेला पोहोचला होता. या आनंदोत्सवाचा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाने गुरुवारी समारोप झाला. शहराचा मध्यवर्ती व सर्वाधिक गर्दीचा भाग असलेला रविवार कारंजा परिसर दसºयाच्या पूर्वसंध्येपासूनच फुले व आपट्याची पाने अर्थात सोने घेऊन आलेल्या विक्रेत्यांनी गजबजला होता. यंदा मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक झाल्याने या भागात पिवळी मखमल अंथरल्याचा भास होत
होता. गुरु वारी सकाळपासून आपट्याच्या पानांचे सोने व फुले खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती.
महागाईने होरपळून निघालेल्या बाजारपेठेला गणेशोत्सवापासून काहीसा दिलासा लाभला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरातून संचलन केले. विविध कंपन्यांमध्ये यंत्रसामग्रीचे तर पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन केले गेले. नाशिकरकांनीही घरोघरी शस्त्रपूजन केले. व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांचे वाहनांचे यंत्रसामग्रीचे पूजन केले.
फुलांची तोरणे आणि सडा-रांगोळी
दारावर लावलेली तोरणे, अंगणातील रांगोळी-सडा आणि एकमेकांना शुभेच्छा देणारे नाशिककर अशा उत्साहपूर्ण वातावरणात दसरा सण उत्साहात साजरा झाला.
४नाशिकरोड, रामकुंड व गंगापूररोड परिसरात मावळतीला मोठ्या उत्साहात रावणदहन झाले. त्यातील आकर्षक आतषबाजी पहायला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
४अनेकांच्या मोबाइलवर दिवसभर एसएमएसच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पडला.

Web Title: Looted 'gold' by Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.