मोटारींच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:49 AM2019-06-12T01:49:05+5:302019-06-12T01:50:41+5:30
शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.
नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.
पहिल्या घटनेत पंडित कॉलनीमध्ये अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या इनोव्हा मोटारीची (एमएच १५ सीव्ही ८१११) चालकाच्या बाजूची काच फोडून काळ्या रंगाची बॅग पळविली. या बॅगेत १ लाख ९५ हजार रुपयांची रोकड लुटली. सोमवारी (दि.१०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. उमाकांत पुंडलिक शिंदे (४१ रा. कोराटे, ता. दिंडोरी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सिटी सेंटर मॉलसमोर सोमवारी (दि.१०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुभाष लक्ष्मणराव दर्वे (५२, रा. राजीवनगर) यांच्या मालकीची स्विफ्ट मोटारीची (एमएच १५ डीएम ०२७०) चालकाच्या बाजूची काच फोडून बॅग घेऊन पळ काढला.
बॅगेत २० हजारांचा लिनोव्हाचा आय-३ प्रोसेस, ५०० जीबीचा हार्डडिस्कसह कागदपत्रे गहाळ झाली आहेत. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसºया घटनेत कॉलेजरोडवरील एका हॉटेलच्या परिसरातून चोरट्याने रविवारी (दि.९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहुल प्रकाश जाधव (३७, रा. गंगापूररोड) यांच्या स्कोडा मोटारीची (एमएच १५ एफएफ ११०१) काच फोडली. कारमधून चोरट्याने सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, साडेपाच हजारांचे शूजचे दोन जोड, दहा हजार रु पयांची रोख रक्कम, मोबाइल असा एकूण ४५ हजार ५०० रु पयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
२५ हजारांची चोरी
चौथ्या घटनेत तुपसाखरे लॉन्सजवळील एसएमबीटी क्लिनिकजवळ उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने रोकड असा २५ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.१०) मध्यरात्री घडली. याप्रकरणी सौरभ शिवराज निकुंभ (२८, रा. धुळे) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. पाचवी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राजीवनगर येथे घडली. एका हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून ११ हजारांची रक्कम, कागदपत्रे लंपास केली.