बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:58+5:302021-07-03T04:10:58+5:30

कृत्रीम टंचाई ज्या बियाण्याला मागणी आहे, त्याची विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून, शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात ...

Looting of farmers from seed sellers | बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

Next

कृत्रीम टंचाई

ज्या बियाण्याला मागणी आहे, त्याची विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून, शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात असल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडत आहेत. निफाड तालुक्यातील विंचुर येथील एका विक्रेत्याकडे या बियाण्याची चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला त्या बियाण्याचे शॉर्टेज असल्याचे सांगितले. किती बॅग हव्या आहेत, याची चौकशी करून त्याने एका पाकिटाची किंमत १,२८० रुपये सांगितली. त्याच वेळी एका शेतकऱ्याला तेच बियाणे १,२९० रुपयांना विकले. हेच बियाणे शेजारच्या दुकानात विचारले, तर त्याने १,२५० रुपयांना दिले . गावपातळीवरून हेच बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्याकडे चौकशी केली असता, त्याला त्याच बियाण्याची किमत १,४०० रु. पाकीट सांगण्यात आली होती.

चौकट-

कृषी विभागाचे दुर्लक्ष

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची अशा प्रकारे लूट होत असताना, कृषी विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या काळात शेतकरी गरजवंत असतो. वेळेत पेरणी झाली नाही, तर त्याचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते, शिवाय दूरवरच्या गावातून बाजारपेठेत येत असल्यामुळे रिकाम्या हाताने परत जाणेही त्याला परवडणारे नसते. यामुळे विक्रेते मागतील ती किंमत देणे त्यांना भाग पडते. याबाबत कृषी विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Looting of farmers from seed sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.