लुटमार करणारे विधी संघर्षित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:41+5:302021-03-06T04:13:41+5:30

पंचवटी : कॉलेजला जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना दुचाकी आडवी घालत त्यांना शस्त्राचा धाक दाखवून खिशातील मोबाईल तसेच रोख रक्कम जबरदस्तीने ...

Looting rituals in conflict custody | लुटमार करणारे विधी संघर्षित ताब्यात

लुटमार करणारे विधी संघर्षित ताब्यात

Next

पंचवटी : कॉलेजला जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना दुचाकी आडवी घालत त्यांना शस्त्राचा धाक दाखवून खिशातील मोबाईल तसेच रोख रक्कम जबरदस्तीने लुटणाऱ्या संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आडगाव पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा ५० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

दहा दिवसांपूर्वी तपोवन वॉटर प्लांट येथून कॉलेजला चालत जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना भररस्त्यात दुचाकी आडवी घालत धारदार कोयत्याच्या धाक दाखवत जबरदस्तीने त्यांच्याकडील दोन मोबाईल तसेच अकराशे रुपयांची रोख रक्कम लुटून नेली होती. या घटनेनंतर आडगाव पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून गुन्हा शाखेच्या भास्कर वाढवणे, जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, आदींनी नाशिक रोड गोरेवाडीत राहणाऱ्या दीपक दिगंबर गायकवाड व जेल रोड येथील अनिकेत राजू रोकडे यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी ही लूट केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी दिली.

Web Title: Looting rituals in conflict custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.