13 लाखांच्या फायर बॉल साठी 89 लाखाचा खर्च मनपात लुटालूट सुरू: निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:55+5:302020-12-29T04:12:55+5:30

नाशिक - आग विझवण्यासाठी महापालिकेने फायर बॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल 89 लाख रुपयांच्या निविदा काढल्या ...

Looting of Rs 89 lakh for 13 lakh fireballs: Tender likely to be controversial | 13 लाखांच्या फायर बॉल साठी 89 लाखाचा खर्च मनपात लुटालूट सुरू: निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता

13 लाखांच्या फायर बॉल साठी 89 लाखाचा खर्च मनपात लुटालूट सुरू: निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता

Next

नाशिक - आग विझवण्यासाठी महापालिकेने फायर बॉल खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल 89 लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत तथापि अधिकृत विक्रेते आणि ऑनलाईन वेबसाईटवर अवघ्या हजार ते दीड रुपयांना मिळणाऱ्या या फायर बॉलसाठी महापालिका तब्बल 89 लाख रुपये मोजण्यास तयार झाल्याने घोटाळ्याचा वास येऊ लागला आहे.

महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक निविदेतच गोंधळ जाणवत आहे. त्यात आता फायर बॉल निविदेची भर पडली आहे. अन्य निविदा प्रकारांपमाणेच विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून अटी शर्ती निश्चित करून अवास्तव रक्कम देण्याचा घाट घातला जात असल्याचा संशय आहे. शहरात लागणाऱ्या आगीची दुर्घटना सामोरे जाण्यासाठी महापालिकेने अनेक प्रकारचे नवीन साधने घेतले आहेत मात्र आता फायर बॉल हे नवीन प्रकरण सुरू केले आहे आग विझवण्यासाठी अशा प्रकारचे फायर बॉल टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला जातो महापालिकेने अशा प्रकारचे 1391 फायर बॉल खरेदी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी एकूण खर्च 88 लाख 86 हजार 820 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मनपाच्या निविदेतील एकूण खर्च बघितला तर प्रति फायर बॉल नग 6 हजार 388 रुपये असा दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात काही वितरकांकडून मिळालेल्या माहिती नुसार महापालिकेच्या निकषानुसार दिलेला एक फायर बॉल 1250 रुपयांना मिळू शकतो त्यातही वेगवेगळ्या स्कीम असून 199 पेक्षा अधिक फायर बॉल खरेदी केल्यास कम्पनी जेमतेम 900 रुपयांना एक या प्रमाणे दर आकारू शकते. अशाच प्रकारे अन्य कंपन्यांचे दर आहेत. म्हणजे जीएसटी 18 टक्के धरूनही प्रति फायर बॉल अगदी टोकाची रक्कम धरली तरी 1300 ते 1400 रुपयांपेक्षा अधिक दर नाही. एमआरपीचा आधार घेतला तरी चार हजार रुपयांच्या आतच एक फायर बॉल मिळू शकतो मग एका फायर बॉलची किंमत 6 हजार 300 रुपये कोणी ठरवली, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

...इन्फो...

काय आहे फायर बॉल?

आग विझविण्यासाठी एक प्रकाराचे हे साधन आग लागल्यास त्या ठिकाणी हे फायर बॉल फेकले जातात ते फुटून पावडर अग्निशमन करणारी पावडर पडते आणि त्यातून आग विझण्यास मदत होते.

इन्फो...

व्यवहार्यता तापसलीच नाही

नाशिक महापालिकेने आज वर कधीच या साधनाचा वापर केलेला नाही. त्यामुळे प्रयोगिक तत्वावर काही फायर बॉल वापरून त्याची व्यवहार्यता तपासून मग खरेदी करणे ठीक होते. पण तसे न करता थेट जवळपास एक कोटी रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे.

...इन्फो...

ही संख्या कोणी ठरविली?

महापालिका एकूण 1391 फायर बॉल खरेदी करणार आहे. ही संख्या कोणी ठरवली, सर्वे कोणी केला असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता त्याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

Web Title: Looting of Rs 89 lakh for 13 lakh fireballs: Tender likely to be controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.