भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:53 AM2019-04-18T00:53:11+5:302019-04-18T00:53:34+5:30

सकल जैन समाज मेरी म्हसरूळतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 Lord Mahavir Birth Centers Welfare Festival | भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

googlenewsNext

नाशिक : सकल जैन समाज मेरी म्हसरूळतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गजपंथ येथील मंदिराचे मूळनायक महावीर भगवान असल्याने दरवर्षी शहरात सर्वप्रथम ध्वजारोहण तेथेच केले जाते व तेथूनच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाची सुरु वात केली जाते. त्या परंपरेप्रमाणे सकाळी ध्वजारोहण राजाभाऊ पाटणी, जयप्रकाश आंचलिया, अशोक पाटणी, नयन बुरड, शीतल कासलीवाल आदींच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर भगवंताना पालखीमध्ये बसवून गजपंथ जैन मंदिर म्हसरूळ येथून शोभायात्रा सुरू होऊन गजपंथा जैन सोसायटीमार्गे मेरी जैन स्थानक व तेथून परत गजपंथ जैन मंदिर म्हसरूळ येथे संपन्न झाली.
शोभायात्रेत कुंभकलश घेण्याचा मान सुषमा निरज काला यांना मिळाला. तीर्थंकरांचे माता- पिता होण्याचा मान सुभाष जैन, अनिता जैन यांना मिळाला. तसेच सौधर्म इंद्र होण्याचा मान सतीश जैन व विद्याताई जैन यांना मिळाला.
शोभायात्रा झाल्यानंतर जैन मंदिर म्हसरूळ येथे भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेक संपन्न झाला. त्यामध्ये जलाभिषेक निरज काला, दुग्धाभिषेक एन. डी. ठोले, सर्वोषधी अनुपकुमार खेमचंद जैन, सुगंधित कलश प्रवीण निलखे, चतुष्कोण कलश पालखी ग्रुप, शांतिधारा अभिषेक अंशुल अशोक लोहाडे, अर्चनाफल शीतल बिटोडे यांना मान मिळाला. कार्यक्र मास कैलास कासलीवाल, जयप्रकाश आंचलिया, अभय सुराणा, सुनील ललवाणी, कांतिलाल अलिझाड, संतोष कोटेचा आदी उपस्थित होते.

Web Title:  Lord Mahavir Birth Centers Welfare Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.