भगवान महावीर जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:04 AM2019-04-18T01:04:22+5:302019-04-18T01:04:41+5:30

‘भगवान महावीर की जय’चा जयघोष करीत भगवान महावीर यांच्या चित्ररथांची बुधवारी (दि.१७) शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जैन सेवा संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दहीपूल येथील धर्मनाथ देरा सर येथून अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीर असा जयघोष करीत ढोल पथकाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

Lord Mahavir Jayanti procession | भगवान महावीर जयंती मिरवणूक

भगवान महावीर जयंती मिरवणूक

googlenewsNext

नाशिक : ‘भगवान महावीर की जय’चा जयघोष करीत भगवान महावीर यांच्या चित्ररथांची बुधवारी (दि.१७) शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जैन सेवा संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दहीपूल येथील धर्मनाथ देरा सर येथून अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीर असा जयघोष करीत ढोल पथकाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या ध्यानस्थ प्रतिमेच्या चित्ररथासोबतच मतदान जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. ‘गोधन बचाव’चा संदेश देणारा चित्ररथ शोभायात्रेचे आकर्षण ठरला. शोभायात्रेत आचार्य भव्यभूषण सूरिश्वरजी आदी ठाणा, शिवसुंदर विजय आदि ठाणा, शंकरलाल गांग, अशोक मोदी, कांतीलाल कोठारी, अजय ब्रम्हेचा, पारस लोहाडे, डॉ. अतुल जैन, कैलास पहाडे, सुधीरकुमार काले, अभय हातेड आदी सहभागी झाले होते.
पवन पाटणी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र पहाडे, जयेश शहा, ललित मोदी यांनी केले. सुमीत पटवा यांनी आभार मानले.
संपूर्ण विश्वासाठी गौरवाचा दिवस
भगवान महावीर जन्मोत्सव हे पर्व जैन समाजाचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचा गौरव दिवस आहे. समाज बांधवांनी भगवान महावीर यांचा सत्य, अहिसाचा संदेश संपूर्ण विश्वात न्यावा. क्रोध, मोह, माया, लोभ, अहंकार यांचा त्याग केल्यास प्रत्येक आत्मा परतात्मा बनू शकतो, असे यावेळी मार्गदर्शन करतांना साध्वी डॉ. पुण्यशिलाजी व साध्वी कीर्तीशिलाजी यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात
जैन सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४०० हून अधिक जैन बांधवांनी रक्तदान केले. याचबरोबर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ७०० टॅँकरद्वारे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त गावात पाण्याचे तसेच चाऱ्याचे वाटप केले जाणार असल्याचे यावेळी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्ष मुग्धा शहा यांनी सांगितले.

Web Title: Lord Mahavir Jayanti procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.