भगवान महावीरांच्या अहिंसा तत्त्वाची वर्तमानात अत्यंत आवश्यकता : कपूरचंद बुरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:26 PM2022-04-18T17:26:09+5:302022-04-18T17:28:57+5:30

चांदवड : येथील आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत भगवान महावीर यांच्या विचारांची वर्तमान प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते जैन तत्त्वज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक कपूरचंद बुरड यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. तुषार चांदवडकर होते.

Lord Mahavira's principle of non-violence is very much needed now: Kapurchand Burad | भगवान महावीरांच्या अहिंसा तत्त्वाची वर्तमानात अत्यंत आवश्यकता : कपूरचंद बुरड

चांदवड येथील व्याख्यानात बोलताना कपूरचंद बुरड, समवेत प्रा. तुषार चांदवडकर, डॉ. सुरेश पाटील, सी. के. कुदनर, विजया जाधव व प्राध्यापक.

Next
ठळक मुद्दे क्षमा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, सदाचार या विचारांचा मानवी जीवनात अंतर्भाव झाला पाहिजे.

चांदवड : येथील आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत भगवान महावीर यांच्या विचारांची वर्तमान प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते जैन तत्त्वज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक कपूरचंद बुरड यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. तुषार चांदवडकर होते.

या व्याख्यानात वर्धमान महावीरांच्या पंचमहाव्रतांचे सविस्तरपणे वर्तमान काळातील प्रासंगिकता ही तत्त्वज्ञान व दृष्टांत यांच्या माध्यमातून विशद केले. महावीरांनी सांगितलेल्या क्षमा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, सदाचार या विचारांचा मानवी जीवनात अंतर्भाव झाला पाहिजे. असे ते म्हणाले.
प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्राध्यापक संदीप पगार यांनी केले. सूत्रसंचालन रुतुजा दरेकर आणि शुभदा जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन सारिका जाधव हिने केले. या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. विजया जाधव, भूगोल विभागप्रमुख डॉ. सी. के. कुदनर, प्रा. नितीन जैन, प्रा. श्रीकांत डापसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी किरण वाघ, सुनील बरकले, विशाल बरकले, वैभव आवारे, आश्विनी शिंदे, मोनाली पवार, स्नेहा पवार, सोनाली आहेर यांनी सहकार्य केले.

 

Web Title: Lord Mahavira's principle of non-violence is very much needed now: Kapurchand Burad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.