प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमली रामनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:11 AM2018-03-28T01:11:07+5:302018-03-28T01:11:07+5:30
जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २७) श्रीराम व गरु ड रथोत्सव उत्साहात साजरा झाला.
पंचवटी : जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २७) श्रीराम व गरु ड रथोत्सव उत्साहात साजरा झाला. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून मानल्या जाणाºया रथोत्सवाला यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आणि रथोत्सव डोळ्यात साठवला. मंगळवारी सायंकाळी उत्सव मानकरी पुष्कराजबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते गरु ड रथात रामाच्या पादुका व श्रीराम रथात भोगमूर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. त्यानंतर बुवांनी आदेश दिल्यानंतर बाळू दीक्षित यांनी हिरवा ध्वज दाखवून सहा वाजता रथ ओढण्यास सुरु वात झाली. सुरु वातीला श्रीराम व गरु ड रथाच्या मानकºयांना मानाचा गंध लावून तसेच श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राममंदिरातून भोगमूर्तीची व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बुवांच्या हस्ते मुख्य आरती होताच पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात करण्यात आली. गरु ड रथ ओढण्यास प्रारंभ झाला आणि रामरथ निघाला. राममंदिर येथून काढण्यात आलेली रथयात्रा पुढे ढिकलेनगर, नागचौक, लक्ष्मण झुला, काट्या मारुती चौक, जुना आडगाव नाक्यामार्गे, गणेशवाडी, आयुर्वेद रु ग्णालय समोरून, गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगणापर्यंत काढण्यात आली. रामरथ म्हसोबा पटांगणावर थांबविण्यात आला, तर गरु ड रथ नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, धुमाळ पार्इंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, कपूरथळा मैदान आदी भागांतून मिरविण्यात येऊन पुन्हा दोन्ही रथ रामकुंडावर आणण्यात आले. राम व गरु ड रथाचे सूत्रसंचालन चंदन पुजारी, रघुनंदन मुठे, अविनाश दीक्षित यांनी केले. रथोत्सव यशस्वीतेसाठी रास्ते आखाडा तालीम संघ, अहल्याराम व्यायामशाळा, समस्त पाथरवट समाजातील पंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, माजी महापौर दशरथ पाटील, स्थायी सभापती हिमगौरी अहेर, डॉ. सुनील ढिकले, अॅड. राहुल ढिकले, गुरमित बग्गा, रूची कुंभारकर, कमलेश बोडके, राकेश शेळके, नितीन शेलार, अमित भोईर आदींसह मान्यवरांनी रथाचे दर्शन घेतले. अभिषेक, पूजन करून रामकुंडात भोगमूर्ती व पादुकांना मंत्रोच्चारात अवभृत स्नान घालण्यात आले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी व ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. रथोत्सव मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या, तर चौकाचौकात रथाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष व मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा फलक उभारले होते. रथोत्सवात सहभागी महिलांनी पिवळ्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर रथ ओढणाºया रामभक्तांनी अंगावर पांढरा सदरा परिधान करून भगवा फेटा, कपाळी अष्टगंध लावलेले होते. गरु ड रथाचा मान अहल्याराम व्यायामशाळा, तर रामरथाचा मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, समस्त पाथरवट समाजाकडे असल्याने मानकरी रथाच्या अग्रभागी थांबून रथ ओढत होते. यंदा रथोत्सवात ढोल वाद्य पथक, शहनाई वादक, सहभागी झाले होते. रथोत्सवानिमित्त रथांना विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.