भगवान त्र्यंबकराजाच्या पाळेला पितळेचे सुरक्षा आवरण अर्पण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:02 PM2018-09-09T18:02:12+5:302018-09-09T18:02:33+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील पिंडेभोवती संगमरवराची पाळ आहे. त्यावर पितळेच्या धातुची पाळ तयार करु न सुरक्षा आवरण मुंबई येथील दानशुर अनिल कौशिक यांनी अर्पण केली.
पुरातत्व विभागाचे सहायक संवर्धक नाशिक मंडल हर्षद एम. सुतारिया यांच्या हस्ते पाळ अर्पण करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदीराच्या गर्भगृहातील पिंडीजवळ असणारी संगमरवरी पाळ खराब झाल्याने व स्वच्छतेच्या दृष्टीने या ठिकाणी योग्य व्यवस्था करणे गरजेचे होते. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या सुचनेनुसार कौशिक यांनी संगमरवरी पाळेवर पितळी धातुचे आवरण भगवान त्र्यंबकेश्वराचे भक्त कौशिक यांनी देणगी रु पाने त्र्यंबकेश्वर देवस्थानास अर्पण केली. ही पितळी पाळ जळगाव येथील कारागीर सोनु सुर्यवंशी यांनी तयार केली आहे. या पितळी धातुचे वजन ९५ किलो असुन बाजार भावाप्रमाणे किंमत दोन लाख दहा हजार रु पये इतकी आहे. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, देवस्थानचे त्रिकाल पुजक सत्यप्रिय शुक्ल, मिलींद दशपुत्रे, मकरंद तेलंग, प्रदोष पुष्प पुजक उल्हास आराधी, सुशांत तुंगार, संजय नार्वेकर व कर्मचारी उपस्थित होते.