देवपूरपाडेतही शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 09:51 PM2021-06-03T21:51:46+5:302021-06-04T01:13:09+5:30
लोहोणेर : देवळा तालुक्यातील देवपूरपाडे येथे शेतकऱ्याने साठवून ठेवलेला कांदा चाळीत शेजारील शेतकऱ्याने युरिया खत टाकून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी देवळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोहोणेर : देवळा तालुक्यातील देवपूरपाडे येथे शेतकऱ्याने साठवून ठेवलेला कांदा चाळीत शेजारील शेतकऱ्याने युरिया खत टाकून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी देवळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवपूरपाडे येथील शेतकरी सजन नथू जोंधळे यांनी चार ते पाच ट्रॉली उन्हाळ कांदा हा शेजारील शेतकरी विजय छबु जोंधळे यांच्या कांदाचाळीत साठवणूकीसाठी भरून ठेवला होता.
सदर चाळी शेजारील शेतकरी बाळू छबु जोंधळे त्यांचा मुलगा समाधान बाळू जोंधळे यांनी मंगळवारी (दि.१) चाळीमध्ये युरिया खत टाकून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. असे सजन जोंधळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत देवळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडेराव भवर, पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. (०३ लोहोणेर कांदा)