गिरीश कर्नाड  यांच्या निधनाने साहित्य, नाट्यक्षेत्राची मोठी हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:36 AM2019-06-11T01:36:07+5:302019-06-11T01:37:54+5:30

ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाने साहित्य आणि चित्रपट तसेच नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

 The loss of Girish Karnad leads to a great loss of literature and theater | गिरीश कर्नाड  यांच्या निधनाने साहित्य, नाट्यक्षेत्राची मोठी हानी

गिरीश कर्नाड  यांच्या निधनाने साहित्य, नाट्यक्षेत्राची मोठी हानी

Next

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाने साहित्य आणि चित्रपट तसेच नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
गिरीश कर्नाड यांनी सातत्याने लोकशाही धर्मनिरपेक्षता, सामाजिक सलोखा याबाबतीमध्ये आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या साहित्यामध्ये नाट्यकृतीमध्ये या मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. डाव्या चळवळीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटले़
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने मराठी भाषेसह अनेक भारतीय भाषेवर प्रभुत्व असलेला साहित्यिक आणि विचारवंत हरपला आहे. ते एक श्रेष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक आहेत. हिंदी तसेच मराठी नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रायोगिक रंगभूमीला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भारतीय साहित्यातही त्यांनी मोलाची भर घातली आहे.
- किशोर पाठक, ज्येष्ठ कवी
प्रगल्भ विचारांचा रसिक आणि कलावंत म्हणून गिरीश कर्नाड यांचे भारतीय रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम मोठे होते. तसेच भारतीय वाङ्मयात त्यांनी मोलाची भर घातली आहे. आपल्या लेखनातून आणि नाटकातून त्यांचे साहित्य सृष्टीत समीक्षकांनी कौतुक केले. त्यांच्या सामाजिक भूमिकेबद्दल तसेच नाटकांतील भूमिकेबद्दल सर्वांना आदर वाटत असे.
- नरेश महाजन, ज्येष्ठ कवी
ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळविलेले गिरीश कर्नाड हे आपल्यात नाहीत. त्यांची उणीव भारतीय रंगभूमीला नेहमी भासत राहील. एक विलक्षण ताकदीचा नाटककार हरपला आहे. त्यांच्या भूमिका या काळजाला भिडणाऱ्या होत्या. तसेच त्याचे साहित्य वाचनीय होते. नाशिकला ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांचे भाषण गाजले होते़
- जयप्रकाश जातेगावकर,
नाट्य व्यावसायिक
नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि विचारवंत अशा विविध पैलू असलेले गिरीश कर्नाड हे प्रभावी व्यक्तिमत्व होते. नाशिक येथे ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांनी मांडलेले अत्यंत परखड आणि तर्कशुद्ध विचार सर्वांना भावले. भारताला आताच्या स्थितीत त्यांच्या विचारांची गरज होती. त्यांच्या जाण्याने नाट्य व वाङ्मय क्षेत्राची हानी झाली आहे.
- लोकेश शेवडे, माजी कार्यवाह कुसुमाग्रज प्रतिष्ठान
ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यासाठी नाटककार गिरीश कर्नाड नाशिक येथे आले होते. भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात कर्नाड यांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय व सामाजिक परिस्थितीचे त्यांना तीव्र भान होते. रंगभूमी आणि त्यासंबंधीचे सादरीकरण याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली होती.
- विश्वास ठाकूर,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

Web Title:  The loss of Girish Karnad leads to a great loss of literature and theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.