सायगाव परिसरात खरीप हंगाम तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:54 PM2020-10-04T18:54:41+5:302020-10-04T18:55:07+5:30
सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली तरी हाती कवडीही शिल्लक राहात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा प्रत्येक नक्षत्रात कोसळणाऱ्या पावसाने प्रत्येक पिकाची धूळधाण केली. गाठीला असलेल्या लाल कांद्याचे बियाणे, रोपे वाया गेली.चढ्या दराने आणलेले विविध कंपन्यांचे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाच्या माºयाने निम्मी आर्धी कांदा रोपे सडली. या परिस्थितीतही संकटावर मात करत शेतकऱ्यांनी थोड्याफार लाल कांद्याची लागवडी केली. मात्र पावसाने संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. एकरी पंचवीस हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागले. रोजच्या पावसाच्या माºयाने मूग, भुईमूग, बाजरी काळी पडली आहे. परिणामी सात हजार रुपये दराने विकली जाणारी मूग दीड-दोन हजार दराने विकावी लागली. २१०० रुपयांचा हमीभाव असणारी बाजरी आठशे ते हजार रुपये दराने विकाी गेली. निम्म्या मालाचे शेतातच नुकसान झाले. बाजरी, मकाचा चारा खराब झाला. आता सायगाव परिसरात मका कापणीचा हंगाम सुरू आहे.
रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी मातीमोल दरात शेतमाल विकत आहे. केवळ आठशे ते हजार रुपये दराने मक्याची विक्री करण्याची वेळ आली आहे. शेतमशागतीपासून ते बाजारापर्यंत मका पिकाचा एकरी उत्पादन खर्च ३० हजार रुपये झाला आहे. सरासरी उत्पादनही केवळ तीस क्विंटल पदरात पडत आहे. नदीकाठच्या जमिनी उपळल्याने तेथील पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. केवळ कपाशी पिकावरच शेतकºयांची सर्व भिस्त अवलंबून आहे. उन्हाळ कांदा बियाणांचा तुटवडा असल्याने रब्बी हंगामात पुन्हा कोणते पिके घ्यावे, हा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. (०४सायगाव)