अवकाळी पावसाने लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:39 PM2019-09-26T22:39:52+5:302019-09-26T22:43:32+5:30

नांदूरवैद्य : अस्वली स्टेशन परिसरात काल झालेल्या ज़ोरदार पावसामुळे सुमारे तीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भरवस्तीत अचानक पुराचे पाणी आल्यामुळे शेती, संसारोपयोगी साहित्य तसेच सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुक्सान झाले आहे.

 Loss of millions due to rains | अवकाळी पावसाने लाखोचे नुकसान

अवकाळी पावसाने लाखोचे नुकसान

Next
ठळक मुद्देअस्वली स्टेशन : तलाठींकडून पंचनाम्यांना सुरूवात

नांदूरवैद्य : अस्वली स्टेशन परिसरात काल झालेल्या ज़ोरदार पावसामुळे सुमारे तीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भरवस्तीत अचानक पुराचे पाणी आल्यामुळे शेती, संसारोपयोगी साहित्य तसेच सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुक्सान झाले आहे.
लष्करी हहद्दीतुन आलेल्या पुराच्या पाण्याचा तडाखा थेट नागरीवस्तीला बसला आहे. त्यामुळे बेलगाव कुºहे स्मशानभूमी आणि तुकाराम गुळवे यांच्या घराला देखील पाण्याने वेढा दिला. यात गुळवे यांची गाय पाण्यात वाहून गेली तसेच संसारपयोगी साहित्य आणि धान्य व भात पिकाचे नुकसान झाले आहे. हेच पुर पाणी थेट मुंबई-भुसवळ रेल्वे मार्गवर चढले. सुदैवाने खडी वाहून न गेल्यामुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान टळले असले तरी या मार्गावर तीन तास दोन फुट पाणी रहिल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
अनेक रेल्वे गाड्या अस्वली, घोटी, इगतपुरी आणि नाशिक रोड स्थानकांत उभ्या राहून प्रवासांची गैरसोय झाली. सकाळी संथ गतीने तर दुपार नंतर रेलवे सेवा पूर्ववत सुरु झाली.
येथील अनेकांच्या घरात पाच पाच फुट पाणी आल्यामुळे संसारोपयोगी वस्तुंचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीचे पंचनामे तलाठी सुवर्णा गांगुर्डे यांनी सकाळी केले. या नुकसानीची पाहणी हिरामण खोंसकर, अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी केली.
प्रतिक्रि या
अवकाळी पावसाने झालेली नुकसान ही महाभयंकर असून नैसर्गिक आपत्ती पुढे कुणाचेही काही चालत नाही. झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर तात्काळ पाठविला जाईल. नुकसानग्रस्त एकही नागरिक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.
- सुवर्णा गांगर्डे, तलाठी.

(फोटो २६ नांदुरवैद्य)
अस्वली येथे अवकाळी पावसाने फुट वेअर दुकानाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करतांना तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे, समवेत अ‍ॅड. चंद्रसेन रोकडे, तानाजी काजळे व इतर ग्रामस्थ.

Web Title:  Loss of millions due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार