देशमानेत शॉर्टसर्किटमुळे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:37 AM2022-05-28T01:37:30+5:302022-05-28T01:38:11+5:30

येवला तालुक्यातील देशमाने खुर्द येथील संदीप मच्छिंद्र डुकरे यांच्या गट नं. ७३ मध्ये शुक्रवारी (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन फ्रूट कंपनीत असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत संदीप डुकरे यांचे सुमारे २६ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loss of lakhs of rupees due to short circuit in the country | देशमानेत शॉर्टसर्किटमुळे लाखो रुपयांचे नुकसान

फ्रूट कंपनीत लागलेल्या आगीमुळे भस्मसात झालेले साहित्य.

Next
ठळक मुद्देपहाटेची घटना : २६.५ लाख रुपयांची हानी; पंचनामा पूर्ण

मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने खुर्द येथील संदीप मच्छिंद्र डुकरे यांच्या गट नं. ७३ मध्ये शुक्रवारी (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन फ्रूट कंपनीत असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत संदीप डुकरे यांचे सुमारे २६ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, येथील विजेच्या खांबावर प्रथम आग लागली. लगेचच आगीने रौद्र रूप धारण करीत शेडपर्यंत शॉर्टसर्किट होत गेल्याने फ्रूट कंपनीच्या शेडला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी येवला, कोपरगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, आगीच्या रौद्र रूपाने काही वेळाताच क्रेटस् आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते. तलाठी पांडुरंग बोडके यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला आहे.

◆या आगीत एलईडी २ संच, एसी, मोटारसायकल, जनरेटर, प्लास्टिक खोके, डाळिंब पुठ्ठे, पेपरची रद्दी, सीसीटीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रिक वजन काटा, ऑफिस फर्निचर, पत्रा शेड, संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या आहेत.

 

 

Web Title: Loss of lakhs of rupees due to short circuit in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.