चांदोरीत ऊस, चाऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:33 PM2020-06-04T21:33:20+5:302020-06-05T00:33:12+5:30

चांदोरी : शहरासह गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाने शेतीचे नुकसान झाले असून, ऊस व चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि. ३) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.

Loss of sugarcane and fodder in Chandori | चांदोरीत ऊस, चाऱ्याचे नुकसान

चांदोरीत ऊस, चाऱ्याचे नुकसान

googlenewsNext

चांदोरी : शहरासह गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाने शेतीचे नुकसान झाले असून, ऊस व चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि. ३) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जसजसे निसर्ग चक्र ीवादळ नाशिक जिल्ह्यात प्रवेश करत होते तसतसा वाºयाचा व वादळाचा जोर वाढत गेला. गोदाकाठ भागातील ऊस व चाºयाचे त्यात नुकसान झाले. तसेच द्राक्षबागांनाही फटका बसला. अनेक भागात शिवार रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. अचानक जोरदार वारा सुरू झाल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत, तर महावितरण विभागाने खबरदारी म्हणून बुधवार सकाळपासून विद्युतपुरवठा खंडित केला होता. गुरु वारी सकाळी पाहणी करून विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

Web Title: Loss of sugarcane and fodder in Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक