गोदाकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:25 PM2020-09-12T18:25:25+5:302020-09-12T18:28:30+5:30
चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बारामाही म्हणून ओळखली जाणाºया गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे अनेक स्थानिक नागरिक व अभ्यासक सांगत आहे. तसेच या नदीपात्र वाढीमुळे नदीकाठी असलेल्या शेतजमिनी तसेच नदीकाठी असलेल्या गावांना व वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे.
तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असतो या मुळे दारणा व गंगापूर या धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते. तर काही वेळा पुर सदृश्य स्थिती निर्माण होते. व पाणी पात्राच्या बाहेर पडते व या मुळे नदीकाठावरील असलेल्या शेत जमिनीतील मातीचे सखलन होते असे अनेक वर्षापासून सुरू आहे.
आॅगस्ट २०१९ वर्षी गंगापूरसह दारणाधरण समूहातून करण्यात येणाºया पाण्याच्या विसर्गामुळे चांदोरीस पुराचा विळखा बसला होता. महापुराने पिके गेली शिवाय जोरदार प्रवाहामुळे नदीच्या दोन्ही काठाची मोठ्याप्रमाणात झीज झाली आहे. मळीचा भाग वाहून गेल्याने शेतकºयांचे नुसकान झाले आहे. शेतकºयांची एकूण शेती क्षेत्रात असलेली मोजणी व प्रत्यक्ष क्षेत्र यांचा मेळ घालणे कठीण होत चालले आहे. शिवाय माती वाहून गेल्याने पिकांचेही क्षेत्र घटले आहे.
गोदावरी नदीस येणाºया पुरामुळे पिकांच्या नुसकानी बरोबरच सुपीक शेती योग्य माती वाहून जाते. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा राहतो. पुन्हा क्षेत्र तयार करण्यास वेळे लागतो. व खर्चही वाढतो अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करत आहे.
काय उपाय करता येऊ शकता
सायखेडा-चांदोरी येथे गोदावरी नदीला वळण आहे यामुळे पुरस्थितीत नदीचे पाणी थेट गावात व नदी काठालगतच्या वस्त्यात शिरते व तसेच पुर पाण्याने शेत जमिनीचे सखलन होत असलेल्या ज्या ठिकाणी सखलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी नदी पात्राला संरक्षक भिंत बांधावी.