बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान, आमदारांपुढे मांडले गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 PM2021-03-15T16:29:03+5:302021-03-15T16:29:55+5:30
चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या.

लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील बाजारपेठ मोठी असल्यामुळे तालुक्यातून व बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. असेच बंद सुरू असले तर व्यापारावर परिणाम होईल. आहेर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व येत्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, सुशील पलोड, अजित तिल्लोडा, सुनील डुंगूरवाल, मुकेश कोकणो, किशोर कोकणो, तुषार झारोळे, विशाल ललवाणी, किरण बोरसे, विकी बोरसे, विशाल जाधव, रितेश अग्रवाल, अनिल कोतवाल, शुभम झांबरे, संतोष झारोळे व व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.
चांदवड येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याशी चर्चा करताना व्यापारी सुशील पलोड, अजित तिल्लोडा, विशाल ललवाणी,तुषार झारोळे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे आदी. (१५एमएमजी१)