बसमध्ये हरविलेले दागिने, पैसे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:32 PM2020-02-01T22:32:06+5:302020-02-02T00:17:02+5:30
माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद गळून पडतात. असतो तो केवळ माणुसकी व प्रामाणिपणाचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नावदेखील ठाऊक नसते. तो मदत करतो व निघूनही जातो. हाच जगण्यावरील विश्वास वाढविणारा चांगुलपणा असतो. असाच एक प्रामाणिकतेचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत परिसरातील डेरे दांपत्याला अनुभवयास मिळाला.
पिंपळगाव बसवंत : माणसाने माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अशी अनेक माणसे आहेत की, जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणताही मोह न ठेवता प्रामाणिक असतात आणि असेच प्रामाणिक माणसापुढे धर्म, जात, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद गळून पडतात. असतो तो केवळ माणुसकी व प्रामाणिपणाचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नावदेखील ठाऊक नसते. तो मदत करतो व निघूनही जातो. हाच जगण्यावरील विश्वास वाढविणारा चांगुलपणा असतो. असाच एक प्रामाणिकतेचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत परिसरातील डेरे दांपत्याला अनुभवयास मिळाला.
चांदवड -वडाळीभोई मार्गे नाशिकला जाणाºया लासलगाव आगारच्या बसने पिंपळगाव येथील किरण व कोमल डेरे वडाळी येथून प्रवास करीत होते. पिंपळगाव बसस्थानकावर ते दुपारी उतरले. मात्र, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण ज्या बसमध्ये प्रवास करीत होतो त्यात आपली पर्स राहिली. त्यात २६५० रोख रक्कम व १६ हजार किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र होते. डेरे यांनी याबाबत पिंपळगाव बसस्थानकावर चौकशी केली असता वाहतूक नियंत्रक बाबूराव सानप यांनी ती पर्स वाहक एम. बी. महाले व चालक डी. आर. पोटे यांनी दिली असल्याचे सांगितले. खात्री झाल्यानंतर डेरे यांना ती पर्स देण्यात आली. वाहक महाले, चालक पोटे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. कैलास शेळके, विजय शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.