आरटीईच्या १८६० जागांसाठी लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:13 PM2019-04-10T23:13:20+5:302019-04-10T23:14:07+5:30
नाशिक : आर्थिक दुर्बल व सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागा राज्य स्तरावरून राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये या प्रवेशप्रक्रियेत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ९२ शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार असून, या प्रक्रियेची सोडत पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाइलद्वारे एसएमएस मिळणार असला तरी पालकांनी आॅनलाइन पोर्टलवरून अर्जाची स्थिती माहिती करून घेत पुढील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

नाशिक शहरात आरटीईअंतर्गत प्राथमिकच्या (पहिली) प्रवेशासाठी १८२१, तर पूर्व प्राथमिकसाठी (नर्सरी) ३९ जागा उपलब्ध आहेत. या शाळांसाठी पाकलकांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, उपलब्ध जागांवर प्रवेश निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. ८) पुणे येथून राज्यस्तरावर लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पालकांना मिळणार आहे़ शहरातील पडताळणी केंद्र्रावर जाऊन प्रवेश निश्चित करावा. शहरात चार पडताळणी केंद्र असून, त्यांना संलग्न शाळांमधील प्रवेशाची पडताळणी प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रातून केले आहे.