सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:51 PM2018-08-19T22:51:00+5:302018-08-20T00:46:05+5:30
समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.
ममदापूर : समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.
शास्त्री महाराजांनी ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया। उभारीला देवालया। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेव रचिला पाया। नामात याच्या किकिर त्याने केला विस्तार ज्ञानदेव रचिला पाया। हा बहिणाबाई महाराज याचा अभंग सेवेसाठी घेतला. शास्त्री महाराज पुढे म्हणाले, ज्ञानोबारायांनी सामाजिक समरसतेचा पाया घातला. त्यांनी कान्होपात्रा, गोरोबा कुंभार, चोखामेळा, संत सेना महाराज, सावता महाराज असे सर्व समाजाचे संत वाळवंटात एकत्र करून खºया अर्थाने पाया रचला. वारकरी धर्माचा प्रचार नामदेव महाराज यांनी केला. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेव महाराज यांनी पाया रचला तर याचा कळस तुकाराम महाराज यांनी केला. भूतलावावर जेवढे जीव आसतील त्यावर निरपेक्ष प्रेम करा, असे शास्त्री महाराज यांनी सांगितले.
याप्रसंगी बहिणाबाई महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुसूदन महाराज, मोगल बाळासाहेब दाणे, संपत आहेर, भास्कर दाणे, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब थोरात, गोपीनाथ दाणे, ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दाणे, विनायक थोरात, रवींद्र दाणे, राजेंद्र दाणे, नवनाथ दाणे रखमा दाणे, सुनील गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहाला ग्रामस्थांनी उपस्थित
राहून कीर्तनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा समावेश
बहिणाबाई महाराज यांचा सप्ताह मधुसूधन महाराज मोगल यांनी ३९ वर्षांपूर्वी सुरू केला आहे. देवदरी येथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दोन ट्रॉली बाजरीच्या भाकरी व आमटी प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. येथे ममदापूर, खरवंडी, देवदरी, राजापूर, कोळगाव, भारम, वाघाळा, रेडाळा, सोमठाण जोश या गावातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक ज्ञानामृताचा लाभ घेत आहेत.