कमी आॅक्सीजन वापर उदयोगांना आता परवानग्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:15 PM2020-09-30T23:15:47+5:302020-10-01T01:14:59+5:30
नाशिक: आॅक्सीजनची आवश्यकता आणि एकुणच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत वैद्यकीय कारणाकरीता आॅक्जिनचा पुरवठा ही नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता राणार असल्याने आॅक्जिनचे उत्पादन वाढविण्यासाठी काही उद्योगांना परवानग्या दिल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

सद्यस्थितीत हॉस्पीटलमधील आॅक्सिजन वापरावर योग्य नियंत्रण स्थापित करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे जिल्'ातील आॅक्सिजन उत्पाद देखील वाढविण्यात येऊन त्याची वाहतूक सुरूळीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या उद्योगांचा आॅक्जिसन वापर अतिशय कमी आहे अशा सर्वांना आता परवानग्या दिल्या जात आहेत. ज्यांना परवानगीची आवश्यकता आहे त्यांमा जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे.
अत्यल्प आॅक्सिजन वापर व जास्त कामगार अशा उद्योगांना प्राधान्याने मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगतांना वैद्यकीय कारणाकरीता आॅक्सिजनचा पुरवठा ही कायमच सर्वोच्च प्राथमिकता राहाणार असल्याचे जिल्'ाधिकारी स्पष्ट केले आहे.
जिल्'ात खासगी तसेच सरकारी रूग्णालयांना लागणाºया आॅक्सिजन पुरवठयाच्या संदर्भात अधिक काळजी सध्ये घेतली जात आहे. मध्यंतरी आॅक्जिजन पुरवठा आणि उत्पादनाच्या संदर्भात निर्माण झालेला विसंगती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार आता आॅक्सिजनसाठी काही उद्योगांना प्राधान्याने मंजुरी देण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे.