कमी दाबाचा पट्टा, मानवी हस्तक्षेप पुराची प्रमुख कारणे : डॉ. प्रमोद हिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 01:20 AM2021-12-22T01:20:47+5:302021-12-22T01:25:39+5:30
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.
ref='https://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच गंगापूर धरणातून विसर्ग केल्यास गोदावरीला येणारा पूर टाळता येऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार नाही. चक्रीवादळे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे ही पूरस्थितीची प्रमुख कारणे असून, काही मानवनिर्मित कारणेदेखील असल्याचे मत डॉ. प्रमोद हिरे यांनी व्यक्त केले. तसेच गोदावरीला आलेल्या पुराच्या पातळीविषयी डॉ. हिरे यांनी माहिती दिली.नदी महोत्सवात ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. मंगळवारी (दि. २१) दरबार हॉल, सरकारवाडा येथे या महोत्सवाची सांगता झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, योगेश कासार उपस्थित होते.डॉ. हिरे म्हणाले, ज्या पुरांचे मोजमाप करण्यात आले त्यास ‘आधुनिक पूर’ म्हणतात; तर मोजमाप नसलेले पूर ऐतिहासिक पूर आहेत. नोंदी नसलेल्या प्राचीन पुरांचा अभ्यास सुरू आहे. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पूर मोजण्याचे प्रमाण मानले जाते. मात्र तो शास्त्रीय आधार नाही. भारतात ५०० वर्षांपूर्वीच्या पुराची नोंद आढळत नाही. सक्रिय आणि जोमदार मान्सून, कमी दाबाचे पट्टे ही पुराची प्रमुख कारणे आहेत. पूर ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे पुराचे प्रमाण वाढले आहे. १९६९ च्या तुलनेत गोदावरी व गिरणा नद्यांना मोठा पूर आले नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदावरीला १९१९ मध्ये पूर विसर्गाने मोठा होता. तर १९६९ मध्ये पाण्याची पातळी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.-- दुष्काळ अधिक त्रासदायक : जिल्हाधिकारीबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होताच धरणातून विसर्ग केल्यास पुराचे नियंत्रण करता येऊ शकते, असे मत डॉ. हिरे यांनी मांडले. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस येईलच असे नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या तुलनेत पुराचा सामना करणे सोपे असते. दुष्काळ जास्त त्रासदायक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर आटोक्यात आणण्यासाठीचे पर्याय आणि उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी केली.