जयंतनगरला कमी दाबाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:58+5:302021-01-23T04:14:58+5:30
बंदी असूनही गोदाघाटावर वाहनांची सफाई नाशिक : गोदाघाट परिसरात वाहन धुण्यास बंदी असतानाही अनेक वाहनचालक गाडगे महाराज पूल परिसरात ...
बंदी असूनही गोदाघाटावर वाहनांची सफाई
नाशिक : गोदाघाट परिसरात वाहन धुण्यास बंदी असतानाही अनेक वाहनचालक गाडगे महाराज पूल परिसरात वाहणे धुताना दिसतात. याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार समज देऊनही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गोदावरीच्या पाणी प्रदूषणात वाढ होत आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उद्यान परिसरात स्वच्छतेची मागणी
नाशिक : उपनगर येथील खोडदेनगर भागातील उद्यान परिसरात पालापाचोळा साचला असून, उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जेलरोड भाजीबाजाराचा आवाका वाढला
नाशिक : जेलरोडवरील भाजीबाजारात भाजी विक्रेत्यांबरोबरच विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांचीही मोठ्या प्रमाणात दुकाने दिसू लागली आहे. यामुळे या बाजाराचा आवाका दिवसागणिक वाढू लागला आहे. या बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.
गोदाघाटावर नागरिकांची संख्या वाढली
नाशिक : लॉकडाऊन उठल्यानंतर सायंकाळच्या वेळी गोदाघाटावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यामुळे गोदाघाट परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळात या विक्रेत्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. आता या विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मोकळ्या मैदानांवर मद्यपींचा अड्डा
नाशिक : शहरातील विविध परिसरात असलेली मोकळी मैदाने रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनू लागली आहेत. सायंकाळानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असतो. या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून मद्यपींना आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दिंडोरी रोडवर वराहांचा सुळसुळाट
नाशिक : पंचवटीतील दिंडोरी रोडवर फुलेनगर झोपडपट्टी परिसरात वराहांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. दिवसभर वराह रस्त्यांवर आणि उकिरड्यांवर फिरत असतात. यामुळे काहीवेळा दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. महापालिकेने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.