नाशकात विविध भागात कमी दबाने पाणी पुरवठा; नागरिकांचा संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 04:29 PM2020-06-09T16:29:35+5:302020-06-09T16:32:48+5:30

शहरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी या विरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिधींकडे व मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर या भागात टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

Low pressure water supply in Nashik; Citizens' anger | नाशकात विविध भागात कमी दबाने पाणी पुरवठा; नागरिकांचा संताप 

नाशकात विविध भागात कमी दबाने पाणी पुरवठा; नागरिकांचा संताप 

googlenewsNext
ठळक मुद्देसिडकोत अनियमित पाणी पुरवठा नागरिकांच्या तक्रारीनंतर टँकरद्वारे पाणी

नाशिक : शहरातील विविध भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांनी या विरोधात तिव्र संताप व्यक्त होत आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिधींकडे व मनपा प्रशासनाक डे तक्रार केल्यानंतर या भागात टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. 
येथील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांनी आंदोलन करीत महापालिकेच्या कारभाराबाबत निषेध नोंदविला.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील अवनी सोसायटी परिसर, कामटवाडेगाव परिसर, इंद्रनगरी, दुर्गानगर, एकदंत चौक परिसरात महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत सोमवारी (दि.८) येथील महिलावर्गाने अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत नगरसेवक सुधाकर बडगुजर, वर्षा बडगुजर यांना याबाबत तक्रार केल्यानंतर बडगुजर दाम्पत्यांनी पाणीपुरवठा होत नसल्याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर मनपा आयुक्तांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.  दरम्यान, जोपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Low pressure water supply in Nashik; Citizens' anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.