कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:48 PM2016-03-11T22:48:14+5:302016-03-11T22:48:39+5:30

दिंडोरी तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

Low rainfall results: Hundreds of bollworms; Tackling of agriculture, water logging for water | कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

Next

भगवान गायकवाड ल्ल दिंडोरी
गेल्या काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा सारीच धरणे अर्धी भरली. परिणामी आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कूपनलिका आटल्या असून, विहिरींनी तळ गाठला आहे.
कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांलगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळा पोहोचत नाही तर यंदा टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकर मागणीची वेळ येणार आहे तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे. दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून, गावोगावी शेकडो कूपनलिका हातपंप आहे. मात्र यंदा प्रथमच विविध कूपनलिकांचे पाणी आटले असून, हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फे आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावातील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध गावात कूपनलिका खोदण्यात येत आहे; मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एकपाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाडी-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहोचल्या असून, यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.
कादवासह इतर नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांना पाणीटंचाई दिंडोरी तालुक्यात सात धरणे असून, कादवा, उनंदा, कोलवण या प्रमुख नद्यांवर विविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने या नद्यांना पाणी सोडले न गेल्याने साऱ्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने चिंचखेड, कुर्णोली, खडकसुकेणे, लोखंडेवाडी, जोपूळ, मातेरेवाडी, पाडे, हातनोरे यांचा समावेश आहे.

Web Title: Low rainfall results: Hundreds of bollworms; Tackling of agriculture, water logging for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.