येवल्यात कमी भाव मिळाल्याने कांदा ओतला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:51 AM2018-12-08T01:51:34+5:302018-12-08T01:51:51+5:30

कांद्याच्या भावातील घसरण सुरूच असून, शुक्र वारी (दि. ७) कांद्याला १८२ रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाल्याने वैभव खिल्लारे या शेतकऱ्याने बाजार समितीसमोरील रस्त्यावरच कांदे ओतून आपला संताप व्यक्त केला.

On low street in Yeola, onion paved the way | येवल्यात कमी भाव मिळाल्याने कांदा ओतला रस्त्यावर

येवल्यात कमी भाव मिळाल्याने कांदा ओतला रस्त्यावर

googlenewsNext

येवला : कांद्याच्या भावातील घसरण सुरूच असून, शुक्र वारी (दि. ७) कांद्याला १८२ रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाल्याने वैभव खिल्लारे या शेतकऱ्याने बाजार समितीसमोरील रस्त्यावरच कांदे ओतून आपला संताप व्यक्त केला.
शुक्रवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक नेहमीप्रमाणेच होती. सकाळी लिलावामध्ये उन्हाळ कांद्याला १०० ते ५०० रुपयांदरम्यान भाव होते; मात्र लिलावातील दोन-तीन हारी संपल्यावर कांद्याला १०० रुपयांच्या आसपास भाव पुकारले जाऊ लागले.
त्यात तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी वैभव खिल्लारे यांच्या ट्रॅक्टरमधील कांद्याला अवघा १८२ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कांदा साठवूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने खिल्लारे संतप्त झाले. या संतापातूनच त्यांनी बाजार समिती समोरील मालेगाव-कोपरगाव राज्य महामार्गावर कांदा ओतून आपला निषेध व्यक्त केला.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सुमारे २८० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. काही ठरावीक उन्हाळ कांद्याला ५०० रुपयांच्या आसपास दर मिळाला; मात्र बहुतांश कांदा हा २५० ते २७५ रुपये या सरासरीने गेला. कमीत कमी १०० रु पये प्रतिक्विंटल असे दर होते. लाल कांद्याला किमान २०० तर कमाल ८५१ रुपये असे दर होते. अजूनही शेतकºयांसह व्यापाºयांकडे उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याच्या दरातील या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.
 

Web Title: On low street in Yeola, onion paved the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.