धान्य काढून अंगणवाड्यांना कमी वजनाच्या पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:42 PM2019-06-19T16:42:00+5:302019-06-19T16:42:14+5:30
नांदगाव : शासनस्तरावर अंगणवाड्यांना पुरविला जाणाऱ्या पोषण आहारात धान्याच्या पिशव्या कापून त्यातले धान्य व दाळी काढून घेऊन कमी वजनाच्या पिशव्या पोहोचविण्यात आल्याची तक्र ार आहे. सदर पिशव्या देताना घाई गर्दीने देऊन पूर्ण माल दिल्याच्या पावत्या देण्यात आल्या असून, त्यावर अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

पिशव्या उतरवून ठेकेदाराच्या गाड्या निघून गेल्यानंतर ही बाब निदर्शनास आली असून, या प्रकाराची चौकशी करून पुरवठा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव बु.चे ग्रामस्थ करत आहेत. ३० किलोच्या एका बॅगमध्ये ४, ५, ६, ७ किलोचा गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्र ारी अंगणवाडीसेविका व कार्यकर्ते यांनी स्थानिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे केल्या आहेत.
नांदगाव तालुक्यात २३५ अंगणवाड्यांपैकी १९६ अंगणवाड्यांना शासनस्तरावरील टेंडरनुसार ठेकेदारामार्फत पोषण आहार पुरविण्यास प्रारंभ झाला आहे. त्यापैकी जळगाव बुद्रुक, येथील अंगणवाडी नं. १ व २ यांना शनिवार व रविवार रोजी आहार पुरविण्यात आला असून, पोषण आहारात प्रत्येकी ३० किलोच्या २ बॅग या प्रमाणे २ बॅगा देण्यात आल्या आहेत. त्यात मठ, तूर, मसूर, चवळी, मूग, आदी कडधान्यांच्या दाळी सोबत तेल, मीठ, मिरची, हळदी आदी मालाचा पुरवठा होत आहे. पुरवठा होत असलेल्या मालात मठ, मूग, गहू, आटा, तूर, चवळी, तांदूळ या दाळीत ३० किलोच्या बॅगमध्ये प्रत्येकी ४, ५, ६, ७ किलोची घट आलेली आहे. या पिशव्या कापून त्यांच्यातून माल काढून घेण्यात आला आहे व पावती देताना पूर्ण माल दिल्याची पोहच पावती अंगणवाडीसेविकांना व मदतनीस यांना दिली आहे.
शासन स्तरावर दिला जाणारा गॅसदेखील अंगणवाडीला देण्यात आला आहे. त्यासाठी अन्न शिजवताना, अंगणवाडीतील किचनमध्येच शिजवून लाभार्थींना द्यायचे आहे.
फोटो : अंगणवाडी आहारातील बॅगा कापून त्यातून आहार काढून घेतला. (19नांदगावआहारं)