खतांच्या किमती कमी करा; सेनेचे कृषिमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:14+5:302021-05-18T04:15:14+5:30
शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, ग्राहक कक्ष शहरप्रमुख किशोर पवार व ग्रामीण ...
शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, ग्राहक कक्ष शहरप्रमुख किशोर पवार व ग्रामीण सोशल मीडियाप्रमुख ललित आहेर आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. कोरोना महामारीत कळवण तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून कळवण, मानूर व अभोणा येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे अत्याधुनिक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्या. कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटर बंद अवस्थेत असून याबाबत आरोग्य विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय मशिनरी व सामग्री, औषधसाठा मुबलक स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात. कळवण उपजिल्हा रुग्णालयात नव्याने ५० बेडचे अत्याधुनिक कोविड सेंटर सुरू झाले आहे, ते पूर्ण क्षमतेने सुसज्ज सुव्यवस्थेसह सुरू करावे, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने तात्काळ नियोजन व उपाययोजना करावी, लहान मुलांना उपचारासाठी एक बालरुग्ण कोविड सेंटरची उभारणी करावी, कोरोना चाचणी केंद्र वाढवावे, कळवण शहरात नगर पंचायतीच्या आरोग्य विभागाने तात्काळ सर्व प्रभागात फवारणी करावी, आदिवासी गावात व पाड्यात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करावी, आदिवासी तालुक्यात लसींचे उद्दिष्ट वाढवावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.