तपोवनात प्रथमच २.२ नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:25 AM2019-02-10T01:25:50+5:302019-02-10T01:26:08+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पुन्हा कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांना थंडी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने तपोवन परिसरात असलेल्या झाडे, शेतीपिकांवर दवबिंदू जमा होऊन नागरिकांना जम्मू-श्रीनगरचा अनुभव आला. यंदाच्या हिवाळ्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, या थंडीचा परिणाम गुलाबपुष्पांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

The lowest recorded temperature of 2.2 in Tapwa | तपोवनात प्रथमच २.२ नीचांकी तापमानाची नोंद

तपोवनात प्रथमच २.२ नीचांकी तापमानाची नोंद

Next
ठळक मुद्देकुंभनगरी गारठली : गुलाबाला फटका; व्हॅलेंटाइन डे अडचणीत

पंचवटी : गेल्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पुन्हा कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांना थंडी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने तपोवन परिसरात असलेल्या झाडे, शेतीपिकांवर दवबिंदू जमा होऊन नागरिकांना जम्मू-श्रीनगरचा अनुभव आला. यंदाच्या हिवाळ्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, या थंडीचा परिणाम गुलाबपुष्पांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
शुक्रवारी रात्री पसरलेल्या थंडीचा जोर शनिवारी दुपारच्या सुमाराला काहीसा असल्याने नागरिकांनी घरात बसून राहणे पसंत केले होते. शुक्रवारी रात्री कडाक्याच्या थंडीमुळे तपोवन परिसरात असलेल्या शेतातील उभ्या पिकांवर परिणाम जाणवला आहे. सर्वाधिक फटका गुलाब पुष्पाला बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पॉलिहाउसमध्ये लावलेल्या गुलाबाच्या कळ्या गारठल्याने त्या उमलेल्या नाही परिणामी गुलाबपुष्पांची आवक घटली आहे. ज्या पॉलिहाउसमध्ये दुपारी उष्णतेने घाम निघायचा त्याच पॉलिहाउसमध्ये शनिवारच्या दिवशी सकाळी अक्षरश: हुडहुडी भरल्याचे परिसरात राहणाºया शेतकºयांनी सांगितले. या भागात नागरिकांनी लावलेले आंबा, पेरूची झाडे तसेच अन्य छोट्या फुलांच्या झाडावर अक्षरश: बिंदू जमले तर घराच्या पत्रांवरून पाण्याचे थेंब पडले होते. संपूर्ण हिवाळ्यातही इतकी थंडी नव्हती एवढी थंडी शनिवारी सिंहस्थनगरी म्हणून ओळखल्या जाणाºया तपोवन परिसरात अनुभवायला मिळाली. थंडीमुळे गुलाबपुष्प पाठोपाठ ऊस तसेच द्राक्ष पिकांवरही काहीसा परिणाम जाणवला आहे. द्राक्ष मण्यांवर दवबिंदू जमल्याने पीक धोक्यात आले आहे.

Web Title: The lowest recorded temperature of 2.2 in Tapwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.