जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:29 AM2018-04-19T00:29:36+5:302018-04-19T00:29:36+5:30
निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हण्ूुन २० एप्रिल हा दिवस देशभरात उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात नव्वद ठिकाणांवर एलपीजी पंचायत होणार आहे. एलपीजी वापर करणाऱ्या व वापर करु इच्छिणाºया महिलांसाठी ही पंचायत होणार आहे. यावेळी एलपीजीचा सुरक्षित सोपा वापर तसेच एलपीजी वापराचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. एलपीजी वापराची सुरक्षितता साहित्य आणि प्रात्यक्षिक तसेच विमा कार्डही वितरित केले जाणार आहे. महिलांचे अनुभव कथन यावेळी होणार आहे, असेही काबरा यांनी सांगितले. निफाड येथे शुक्र वार दि २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता निफाड येथील शिवनेरी लॉन्स येथे एलपीजी पंचायत होणार आहे.
प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या विस्तारीत कार्यक्र मानुसार आता अनुसुचित जाती जमाती महिला,प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिला,अंत्योदय योजना लाभार्थी, वनवासी महिला या एल पी जी च्या नविन लाभार्थी होण्यास पात्र आहेत एल पी जी पंचायतीत नविन अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संबंधितांनी पुर्तता करु न देणे आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत आजवर १ लाख १६ हजार ३७ एलपीजी वापरकर्ते लाभार्थी आहेत. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. एल पी जी पंचायतीत आॅईल व पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी याप्रसंगी दिली.