लगी कलेजवा कटार...सोहम हर डमरू बाजे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:46 AM2019-03-05T00:46:16+5:302019-03-05T00:46:39+5:30
लगी कलेजवा कटार..., सोहम हर डमरू बाजे... यांसारख्या नाट्यगीतांसह मैं तो खेलूंगी उन्हीसे होरी..., अन् तेरो ध्यान धरत... बंदिशीने शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाची मैफल उत्तरोत्तर रंगली.
नाशिक : लगी कलेजवा कटार..., सोहम हर डमरू बाजे... यांसारख्या नाट्यगीतांसह मैं तो खेलूंगी उन्हीसे होरी..., अन् तेरो ध्यान धरत... बंदिशीने शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाची मैफल उत्तरोत्तर रंगली.
कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून नुकतीच साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.४) कुसुमाग्रज स्मारकात गायक श्रीया सोंडूर यांची ‘शास्त्रीय-उपशास्त्रीय’ गायनाची मैफल उत्तरोत्तर रंगली. यावेळी सोंडूर यांनी आपल्या खास शैलीत विविध राग व ख्यालातून बंदीश, होरी सादर करत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
मैफलीचा प्रारंभ श्रीया सोंडूर यांनी धनश्री रागातून विलंबित ख्यालात तीन तालात थे म्हारो राजेंद्र... सादर केली. त्यानंतर द्रूत तीनताल बंदिशीद्वारे उपस्थिताना तल्लीन केले. यानंतर सुवर्णतुला नाटकातील येतील कधी यदूवीर..., ययाती-देवयानीमधील सर्वात्मका सर्वेश्वरा... यांसारखी नाट्यगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी), रसिक कुलकर्णी (तबला) यांनी साथसंगत केली. दरम्यान, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून मैफलीला उपस्थित होते. प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.