खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील यात्रेकरूंना कानटोप्यांचे वाटप

By admin | Published: February 2, 2016 10:28 PM2016-02-02T22:28:57+5:302016-02-02T22:30:23+5:30

खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील यात्रेकरूंना कानटोप्यांचे वाटप

Lump-sum distribution to the pilgrims from Khamkheda to Trimbakeshwar Dindi | खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील यात्रेकरूंना कानटोप्यांचे वाटप

खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील यात्रेकरूंना कानटोप्यांचे वाटप

Next

खामखेडा : येथील लायकेश्वर येथून निघालेल्या पायी दिंडीचे श्रीक्षेत्र भगवान (लायकेश्वर) येथे निवृत्तिनाथ महाराज पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडीचे खामखेडा गावाच्या चौफुलीवर स्वागत करण्यात आले. गुरु दत्त पुरु ष गटाच्या वतीने दिंडीतील यात्रेकरूंना कानटोप्यांचे वाटप देवळा तालुका कृषी अधिकारी संजय गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या नऊ वर्षांपासून खामखेडा येथील श्रीक्षेत्र लायकेश्वर येथून त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त स्वर्गीय महादू तारूबाबा यांच्या आशीर्वादाने व दिंडीचे संस्थापक गोरख शेवाळे,
माजी सैनिक जयराम शेवाळे, सुभाष बिरारी आदिंच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते.
यावेळी कृषी अधिकारी संजय गुंजाळ, देवळा भाजपा अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, विनोद देवरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे, गुरुदत्त पुरुष गटाचे अध्यक्ष महेश शिरोरे, सुनील शेवाळे, नारायण शेवाळे, किरण चिमनपुरे, दत्तू भदाणे, जितेंद्र अहेर, सुभाष बिरारी आदि उपस्थित होते.
सदर दिंडी खामखेडा येथून पिळकोस-बगडू-भेंडी-दहाणे-कुडाने-बाबापूर-मावडी-बोपेगाव-पालखेडा-मोहाडी-शिवनई-म्हसरूळ-नाशिक मार्गाने त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहे.
या पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांची दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था बगडू, कुंडाणे, मावडी, पालखेड, शिवनई, नाशिक, महिरावणी आदि ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे, तर सायंकाळच्या भोजनाची व मुक्कमाची व्यवस्था दहाणे, बाबापूर, बोपेगाव, मोहाडी, म्हसरूळ, पिंपळगाव आदि ठिकठिकाणच्या गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Lump-sum distribution to the pilgrims from Khamkheda to Trimbakeshwar Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.