जनावरांमध्ये पसरतोय लम्पी आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:19+5:302021-07-08T04:11:19+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी आजार पसरू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हा आजार विषानुरूप त्वचारोग ...
चांदोरी : निफाड तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी आजार पसरू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हा आजार विषानुरूप त्वचारोग असल्याने माशा, डास, गोचीड, गोमाशा, उघडा चारा किंवा लम्पी झालेल्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना होतो. याचा प्रसार उष्ण वातावरणात पसरत असून, लम्पी आजाराची लागण जवळपास पाच टक्क्यांपर्यंत पसरली असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लम्पी आजारावरील लसीकरण करून घेणे अत्यावश्यक झाले आहे. लम्पी हा आजार विशेषतः शेळ्या, मेंढ्या किंवा मानवाला होत नाही.
------------------------
ही आहेत लक्षणे
अंगावर दहा ते पंधरा मिलिच्या एक रुपयाच्या शिक्क्याएवढ्या आकाराच्या गाठी येतात, ताप येतो, चारा खाणे कमी होतो, पाय सुजतात, जनावरे लंगडतात, आदी लक्षणे आढळतात.
----------------------
जी जनावरे बाधित झाली आहेत, ती इतर जनावरांपासून लांब बांधणे. गोठा नेहमी स्वछ ठेवावा, गोठ्यात निर्जंतुकीकरण करून घ्यावे. लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत व लम्पी आजारावरील लसीकरण करून घ्यावे.
डॉ. सुनील अहिरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, निफाड