जनावरावर लम्पी विषाणूचं थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:09 PM2020-09-05T15:09:31+5:302020-09-05T15:10:38+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील वडदरा, साकूर, भरवीर, घोटीखुर्द परीसरात जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन ठेऊन बांधत आहेत.

परीसरात गाई, बैलासह हजारो जनावरे या लम्पी आजाराच्या विळख्यात सापडले आहे. आता लम्पीच्या रु पाने नव संकट शेतकऱ्यांपुढे उभ ठाकलं आहे. योग्य माहितीच्या अभावाने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, घाबरायचे कुठले ही कारण नाही, वेळीच उपचार केल्यानंतर हा आजार लवकर बरा होत असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. तसेच प्रशासनाकडून काही उपाययोजना होणे गरजेचे आहे.
कोरोना रोगाच्या संकटामूळे मागील ५ महिन्यापासून दुधाचे भाव कमी झाले आणि जनावरांची खरेदी विक्र ी सुद्धा बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकाचे खुप आर्थिक नुकसान होत आहे. लम्पी स्कीन डिसीज या आजारावर पशुसंवर्धनने लस काढावी आणि सरकारने दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
(फोटो ०५ कवडदरा, १)