चंद्रग्रहण नाशिकमधून दिसले सुस्पष्टपणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 01:03 AM2019-07-18T01:03:22+5:302019-07-18T01:04:12+5:30

गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे विशेष महत्त्व असलेले मंगळवारचे खंडग्रास चंद्रग्रहण हे नाशिकच्या परिघातून अत्यंत स्पष्टपणे दिसले. मध्यरात्रीनंतर काही काळ चंद्रग्रहण दिसल्यानंतर पावसाळी काळ्या ढगांमुळे चंद्रग्रहण धूसर दिसत होते.

 Lunar eclipse appears clearly from Nashik | चंद्रग्रहण नाशिकमधून दिसले सुस्पष्टपणे

चंद्रग्रहण नाशिकमधून दिसले सुस्पष्टपणे

Next

नाशिक : गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे विशेष महत्त्व असलेले मंगळवारचे खंडग्रास चंद्रग्रहण हे नाशिकच्या परिघातून अत्यंत स्पष्टपणे दिसले. मध्यरात्रीनंतर काही काळ चंद्रग्रहण दिसल्यानंतर पावसाळी काळ्या ढगांमुळे चंद्रग्रहण धूसर दिसत होते. मात्र, पुन्हा काही काळाने चंद्रग्रहण स्पष्ट दिसल्याने खगोलप्रेमींनी या चंद्रग्रहणाचा आनंद लुटला.
चंद्रग्रहण किंवा खंडग्रास चंद्रग्रहण तसे बऱ्याचदा दिसत असल्याने त्यात दुर्मिळता हा प्रकार फारसा नसतो. मात्र, आताचे खंडग्रास चंद्रग्रहण हे जवळपास दीड शतकानंतर आले असल्याने सामान्य नागरिकांना त्याबाबत उत्सुकता होती. तर मंगळवारी मध्यरात्रीदेखील खगोलप्रेमी नेहमीप्रमाणे दुर्बिणी सरसावूनच बसलेले होते. नाशिकमध्ये रविवारपासून फारसा पाऊस झाला नसल्याने आकाशदेखील मोकळे असल्याचा लाभ खगोलप्रेमींना झाला.
जुलै महिन्यात चंद्रग्रहण असल्यास पावसाळी वातावरणामुळे ते सुस्पष्टपणे दिसणे अवघड जाते. मात्र, सुदैवाने फारशी पावसाळी हवा नसल्याचा खगोलप्रेमींना लाभ झाला. मध्यरात्री उलटल्यानंतर लगेचच खंडग्रास चंद्रग्रहण दिसू लागले होेते. अनेक नागरिक या चंद्रग्रहणाला सहजपणे बघू लागले असून, या निमित्ताने समाजमनातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होत आहे.
- गिरीश पिंपळे, खगोलतज्ज्ञ
साधारणपणे रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास खंडग्रास चंद्रग्रहण दिसण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर काही काळ त्याची सुस्पष्टता कमी होऊन ते धूसर दिसत होते. मात्र त्यानंतर पुन्हा रात्री २ नंतर खंडग्रास चंद्रग्रहण पूर्ण बहरात दिसत होते. पावणे तीननंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होऊन पाचनंतर ग्रहण पूर्णपणे सुटले.
- दिलीप ठाकूर, खगोल अभ्यासक

Web Title:  Lunar eclipse appears clearly from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक