लुनावत यांच्या अवयव दानाने सात रुग्णांना पुनर्जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:14+5:302020-12-30T04:19:14+5:30
सिडको परिसरातील रहिवासी लालचंद लुनावत यांची सून व नीलेश लुनावत यांची पत्नी दिव्या (४३) यांना ब्रेन ह्यॅमरेज झाल्याने ...
सिडको परिसरातील रहिवासी लालचंद लुनावत यांची सून व नीलेश लुनावत यांची पत्नी दिव्या (४३) यांना ब्रेन ह्यॅमरेज झाल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्राव होऊन त्या कोमात गेल्या होत्या. त्यांच्यावर उपचार करूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून लुनावत परिवाराने त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने दिव्या लुनावत यांचे अवयव दान करण्यात आले. अवयव दानामुळे सात रुग्णांना जगण्याची नवीन उमेद मिळाली. लुनावत यांची दोन किडनी, लिव्हरचा एक भाग दीड वर्षाच्या मुलाला व एक भाग ६५ वर्षाच्या महिलेला दान करण्यात आले. दोन किडनी पुण्याला पाठवण्यात आल्या, तसेच त्वचा व दोन डोळे असे एकूण अवयव दान करण्यात आले. अशाप्रकारे सात रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. (फोटो २८ लुनावत)