‘स्मार्ट पार्किंग’साठी नोव्हेंबरपासून भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:45 AM2019-09-21T01:45:15+5:302019-09-21T01:45:32+5:30
शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्किंगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
नाशिक : शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्किंगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नागरिकांना या भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. कंपनीच्या वतीने आत्ताच याबाबत अंमलबजावणी करण्याची घाई सुरू होती. मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आता वसुली केलीच तर आमदार नाराज होतील अशी कैफियत खुद्द महापौरांनीच मांडल्याने कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नोव्हेंबरपासून वसुली सुरू करा, असे निर्देश दिले.
कंपनीच्या संचालकांची बैठक शुक्रवारी (दि. २०) अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंग सुरू केली असून, सध्या या ठिकाणी पैसे वसूल केले जात नसले तरी लवकरच ही वसुली सुरू होणार आहे.
सध्या शहरात रहदारीच्या मार्गावर कंपनीने अचानक पट्टे मारले असून, त्यामुळे दुकानदार वैतागले आहेत. नागरिकांना दुकानात दोन मिनिटांसाठी जायचे असली आधी तरी भुर्दंड सोसावा लागणार आहे. मुळातच रस्त्यावर वाहन उभे केले तर त्याचे वाहन उचलून वाहतुकीच्या ठिकाणी वाहन उभे केला तर दंड वसूल केला जातो. याचा फटका वाहनधारकांना बसत आहेच.
परंतु कंपनीने त्याच रस्त्यांवर पट्टे मारून आता त्याला कायदेशीरदृष्ट्या मान्यता प्राप्त करून दिली आहे.
मनपाला फक्त १७ लाख,
बाकी ठेकेदाराला
स्मार्ट पार्किंगासाठी पीपीपी मॉडेल असून, त्याअंतर्गत खासगी ठेकेदार कंपनीने सुमारे ७० कोटी खर्च करून सर्व यंत्रणा उभारली आहे. मात्र, स्मार्ट पार्किंगपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेला फक्त १७ लाख रुपये उत्पन्न
दिले जाणार असून, बाकी रक्कम ठेकेदार कंपनीला
दिली जाणार आहे.हा विष्
ाय अधांतरितच
एखाद्या दुकानात किरकोळ खरेदीसाठी जाण्यासाठी अथवा रस्त्यालगत असलेल्या एटीएममध्ये जाण्यासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी किंवा चारचाकी उभी करतात. मात्र, दोन रुपयांच्या वस्तुसाठी दहा रुपयांचा भुर्दंड मोजावा लागणार आहे.
४यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर ठराविक वेळेसाठी वाहन उभे केल्यास शुल्क आकरले जाणार नाही, अशी तरतूद करण्याचे आदेश अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी गेल्या बैठकीनंतर आयुक्तांना दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.