म. फुले जनआरोग्य योजनेत उपचार करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:46+5:302021-03-17T04:15:46+5:30

याबाबत आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता काही रुग्णालयांनी आमच्याकडे तशी खास व्यवस्था नसल्याचे सांगून रुग्णांवर उपचार करू शकत ...

M. Avoid treating flowers in a public health plan | म. फुले जनआरोग्य योजनेत उपचार करण्यास टाळाटाळ

म. फुले जनआरोग्य योजनेत उपचार करण्यास टाळाटाळ

Next

याबाबत आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता काही रुग्णालयांनी आमच्याकडे तशी खास व्यवस्था नसल्याचे सांगून रुग्णांवर उपचार करू शकत नसल्याचे कळविले आहे. शासनाने खासगी रुग्णालयांना या योजनेअंतर्गत उपचार करण्याची सक्त ताकीद दिली असतानाही सदर रुग्णालये काहीतरी कारण सांगून उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

या योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना संबंधित रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक करण्यात यावे. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करणे ही त्या-त्या खासगी रुग्णालयांची जबाबदारी आहे. महापालिका प्रशासनाने याविषयी त्वरित गंभीर दखल घेऊन सदर रुग्णालयांना उपचार करण्यासाठी आदेश पारित करण्यात यावेत. जी रुग्णालये कोरोंना रुग्ण दाखल करण्यास टाळाटाळ करतील अशा रुग्णालयांची म.फुले जनआरोग्य योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.

Web Title: M. Avoid treating flowers in a public health plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.