माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सांगळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:58 PM2020-01-04T22:58:20+5:302020-01-04T22:59:00+5:30

माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सूर्यभान सांगळे यांनी बिनविरोध निवड झाली. सरपंच संगीता सांगळे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी मंडळ अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.

Maalegaon Gram Panchayat sarpanch unopposed to Sushil | माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सांगळे बिनविरोध

सिन्नर तालुक्यातील माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सांगळे यांची निवड झाली त्याप्रसंगी संगीता सांगळे, अनिल आव्हाड, जयश्री जाधव, तुकाराम सांगळे, खंडू सांगळे, वामन गाडे, अशोक जाधव, अमोलिक जाधव, मालती आव्हाड, हर्षदा जाधव, मीना पवार, शैला पवार यांच्यासह ग्रामस्थ.

Next

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव-मापारवाडी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशीला सूर्यभान सांगळे यांनी बिनविरोध निवड झाली.
सरपंच संगीता सांगळे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी मंडळ अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सुशीला सूर्यभान सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून माजी सरपंच संगीता सांगळे, तर अनुमोदक म्हणून अनिल आव्हाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. छाननी प्रक्रियेत सांगळे यांचा अर्ज वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी गाडे यांनी सरपंचपदी सुशीला सांगळे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
बैठकीस मावळत्या सरपंच संगीता सांगळे, उपसरपंच जयश्री जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य अनिल आव्हाड, खंडू सांगळे, वामन गाडे, अशोक जाधव, अमोलिक जाधव, खंडू जाधव, मालती आव्हाड, हर्षदा जाधव, मीना पवार, शैला पवार आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांना कामगार तलाठी राहुल देशमुख, गोराणे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे, लिपिक विलास आवारी, सेवक सतीश घुगे यांनी सहाय्य केले. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच सुशीला सांगळे यांचा मावळत्या सरपंच सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच तुकाराम सांगळे, संजय सांगळे, शरद पवार, मंगेश सांगळे, सूर्यभान सांगळे, रामदास सांगळे, कचरू जाधव, लहानु सांगळे, शिवराम सांगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maalegaon Gram Panchayat sarpanch unopposed to Sushil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.