इगतपुरीत आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 02:45 PM2019-07-27T14:45:32+5:302019-07-27T14:45:42+5:30
घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या औद्योगिक आरोग्य व सुरक्षा कार्यालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी काढले. केवळ औद्योगिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसलेल्या सुरक्षेची सर्वत्र खबरदारी घेण्यासाठी कंपनीने उचललेले पाऊल अन्य कारखान्यासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले.
घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या औद्योगिक आरोग्य व सुरक्षा कार्यालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी काढले. केवळ औद्योगिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसलेल्या सुरक्षेची सर्वत्र खबरदारी घेण्यासाठी कंपनीने उचललेले पाऊल अन्य कारखान्यासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले. इगतपुरीची महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आणि औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा आण िआपत्ती व्यवस्थापनासाठी मॉकिड्रल आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्र मात श्री. गोरे बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले.