पाडळी देशमुखचे आरोग्य उपकेंद्र शुभारंभाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 09:44 PM2020-01-16T21:44:59+5:302020-01-17T01:14:30+5:30

वाडिवºहे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या पाडळी देशमुख उपकेंद्रांची इमारत बांधून तयार व्हायला दोन दशकाच्या वर कालावधी उलटूनही उपकेंद्र ...

Madali Deshmukh's health center awaits inauguration | पाडळी देशमुखचे आरोग्य उपकेंद्र शुभारंभाच्या प्रतिक्षेत

पाडळी देशमुख येथील बंद अवस्थेतील आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार अर्चना पागिरे यांना देतांना तुकाराम वारघडे. समवेत निलेश कडु, योगेश चादवडकर, किशोर जाधव, रामदास गव्हाणे, शिवा काळे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देतीव्र नाराजी : २० वर्षांपासून इमारत बंद अवस्थेत

वाडिवºहे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या पाडळी देशमुख उपकेंद्रांची इमारत बांधून तयार व्हायला दोन दशकाच्या वर कालावधी उलटूनही उपकेंद्र बंदच असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन सदर उपकेंद्र कार्यान्वित करावे अन्यथा प्रजासत्ताकदिनी इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषणाचे पाऊल उचलले जाईल अशा आशयाचे निवेदन आदिवासी समाज संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांनी तहसीलदार अर्चना पागिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
पाडळी देशमुख उपकेंद्र हे पाडळी गावासह मुकणे, शेनवड खुर्द, गरु डेश्वर आदी गावांच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे या हेतूने पाडळी देशमुख हद्दीत महामार्गापासून हाकेच्या अंतरावर उपकेंद्र बांधण्यात आले. पण ही इमारत बांधायचे काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या दोनही बाजूने रेल्वे लाईन असल्याने येथे त्यावेळी वीज व पाण्याची सुविधा होऊ शकणार नाही म्हणून उपकेंद्र बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र सदर उपकेंद्रासाठी आता वीज व पाणीही उपलब्ध होऊ शकते त्यामुळे सदर आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे. यासंदर्भात येत्या २६ जानेवारीपर्यंत योग्य तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी भाजपाचे उपतालुकाध्यक्ष निलेश कडु, अजय कौटे, गणेश रायकर, योगेश चादवडकर, किशोर जाधव, रामदास गव्हाणे, योगेश खकाळे, शिवा काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Madali Deshmukh's health center awaits inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य