मॅडम, मला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:00 AM2018-12-08T01:00:33+5:302018-12-08T01:01:05+5:30
शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे मी परेशान झालोय... सांगा मॅडम, मी जगायचं तरी कसं...? मला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही, असे उद्विग्न उद्गार हताश झालेले शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे यांनी मेहुणे येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर काढले. यावेळी समिती सदस्यांसह उपस्थित शासकीय अधिकाºयांचेही डोळे पाणावले.
मालेगाव : शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे मी परेशान झालोय... सांगा मॅडम, मी जगायचं तरी कसं...? मला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही, असे उद्विग्न उद्गार हताश झालेले शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे यांनी मेहुणे येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर काढले. यावेळी समिती सदस्यांसह उपस्थित शासकीय अधिकाºयांचेही डोळे पाणावले.
‘सांत्वन’ तरी कसे करणार..! दुष्काळ पाहणी दौºयातील सदस्यांना शब्दही फुटेना...!
मेहुणेचे सरपंच निवृत्ती देवरे यांनीही दुष्काळाची भीषणता कथन केली. आमचा गाव चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतोय... दूध आणि कांद्याला भाव नाही... दुष्काळाने गंभीर स्थिती केलीय मॅडम..! आम्हाला उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. कमाईचे साधन नसल्याने मुलाबाळांसह संसाराचा गाडा तरी आम्ही कसा हाकणार? शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केली तरच आम्हाला जगायला बळ मिळेल, असे सरपंच देवरे यांनी सांगितले.
यानंतर दुष्काळ पाहणी पथक वºहाणेकडे मार्गस्थ झाले. वºहाणे शिवारातील बाजीराव पवार यांच्या डाळिंबबागाची पाहणी केली. पवार यांनी गेल्या चार वर्षांपासून डाळिंबबागेवर खर्च केला आहे. स्टेट बॅँकेचे साडेतीन लाख रुपये कर्ज आहे, असे पवार यांनी पथकाच्या छावी झा यांना सांगितले. यावेळी झा यांनी कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रतिप्रश्न केला. यावर पवार म्हणाले, कुछ नही मॅडम, बाटली लेंगे और पी लेंगे असे शब्द उद्गारल्याने समितीसह उपस्थित अधिकाºयांचे मन हेलावले.
शेतकºयांनी दुष्काळी स्थितीच्या मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील केंद्रीय जल आयोगाच्या सहसचिव श्रीमती छावी झा, एमएनसीएफसीच्या सहायक संचालक डॉ. शालिनी सक्सेना, केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, डीटीचे संचालक ए. के. तिवारी या चार सदस्यीय पथकाकडे मांडल्या.
पथकासमवेत जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे विनोद शेलार, आबा साळुंके, राज्याचे पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., येवल्याचे प्रांताधिकारी भीमराव बोराळे, आदी उपस्थित होते.
सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी
च्पाण्याची बाटली २० रुपयाला विकली जाते, तर दुधाला अत्यल्प भाव दिला जातो. पीकविमा काढूनही लाभ दिला जात नाही. मनरेगाच्या कामांची मजुरी अत्यल्प आहे. दोनशे रुपये रोज दिला जातो अशी तक्रार करीत यात वाढ करावी, वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, बॅँक शाखांकडून सुरू असलेली कर्जवसुली आदी मागण्या शेतकºयांनी पथकाकडे केल्या.
च्मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथे पाहणी करत असतानाच गावात पाण्याचा टॅँकर आल्याने महिलांची पाण्यासाठी एकच झुंबड उडाली. टॅँकरचे पाणी हौदात पडत असतानाच महिला पाणी भरण्यासाठी धडपडत होत्या. टॅँकरने पुरविण्यात येणारे पाणी पुरत नसल्यामुळे जास्तीत जास्त पाणी मिळविण्यासाठी महिलांना अशी धडपड करावी लागते असे स्थानिक नागरिकांनी पथकातील अधिकाºयांना सांगितले.