निफाड तालुक्यात खरिपाची मदार सोयाबीनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:06+5:302021-09-14T04:17:06+5:30

तालुक्यात यावर्षी रांगड्या कांद्याची २२०० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता ...

Madar on kharif soybean in Niphad taluka | निफाड तालुक्यात खरिपाची मदार सोयाबीनवर

निफाड तालुक्यात खरिपाची मदार सोयाबीनवर

Next

तालुक्यात यावर्षी रांगड्या कांद्याची २२०० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने उन्हाळा कांदा लागवड जास्त प्रमाणात, तर रांगडा कांदा कमी प्रमाणात लागवड केली जाते. कांदा, सोयाबीन, ऊस हे प्रमुख नगदी पीक म्हणून घेतले जाते. २५ मेट्रिक टन कांदा चाळीसाठी ८७,५०० रुपये अनुदान दिले जाते, तर ठिबक सिंचनसाठी ८० टक्के अनुदान दिले जाते. कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने तालुक्यात कांदा चाळींची संख्या वाढली आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव काही कालखंडात होता, मात्र अजून भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा विकला नाही. मात्र अचानक कांद्याचे भाव कोसळल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा मातीमोल विकावा लागला व आर्थिक गणित कोलमडून गेले होते. उत्पादन खर्चही फिटू शकला नाही.

यावर्षीही सुरुवातीला अतिशय कमी भावाने कांद्याला भाव होता. त्यानंतर गेल्या ३ महिन्यांपासून कांद्याला सरासरी १४०० ते १६०० भाव असल्याने म्हणावा तितका फायदा शेतकऱ्यांना होऊ शकत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने हा भाव फायदेशीर नाही. सध्या भाव वाढत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या तालुक्यात चितेगाव येथे नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था कांद्याच्या नवीन जाती शोधणे व नवीन जाती उपलब्ध करून देणे व इतर कार्य चालत असते. या संस्थेतून कांदा बियाणे विक्री केली जाते, तर पिंपळगाव बसवंत येथेही राहुरी कृषी विद्यापीठाचे कांदा संशोधन केंद्र आहे.

विशेष म्हणजे यावर्षी या तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. यावर्षी सोयाबीनच्या बियाणाची टंचाई भासल्याने हे बियाणे मिळवताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना जादा पैसे देऊन बियाणे विकत घ्यावे लागले. बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या कंपनीचे बियाणे पाहिजे ते मिळू शकले नाही. काही शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे विकत घेऊन पेरणी केली. सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली मात्र पेरणीनंतर पावसाने काही काळ दडी मारली. अशा शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली यात उत्पादन खर्च वाढला गेला.

इन्फो

३५०० शेतकऱ्यांचा पीकविमा

१३ हजार हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड झाली आहे. तालुक्यात मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका पिकाची पेरणी, उत्पादन खर्च, मका पिकाला मिळणारा भाव याचा विचार करता हे परवडेल असे पीक असल्याने मका क्षेत्रात वाढ झाली आहे. खरिपाच्या हंगामात या तालुक्यात आडसाली ऊस लागवड केली जाते. यावर्षी ८ हजार हेक्टर क्षेत्रात आडसाली उसाची लागवड करण्यात आली आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस लागवड क्षेत्रात वाढ होऊ शकते. तालुक्यात आतापर्यंत मिळून ३५०० शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत ५४१ मिमी पाऊस झाला असून हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

कोट...

यावर्षी निफाड तालुक्यात सोयाबीनची पेरणी १८ हजार हेक्टर क्षेत्रात झाली असून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खरिपाची मदार ही सोयाबीनवर असणार आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. या तालुक्यात पिकांची फेरपालट वाढवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कडधान्ये , व गळीताच्या पिकाकडेसुध्दा वळणे आवश्यक आहे.

- बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

फोटो- १३ निफाड खबरबात

130921\13nsk_15_13092021_13.jpg

फोटो- १३ निफाड खबरबात

Web Title: Madar on kharif soybean in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.