नाशकात चामरलेण्याच्या पायथ्याशी रंगला ‘मडबाथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:22 PM2019-04-21T18:22:28+5:302019-04-21T18:27:39+5:30

चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या  जाणाऱ्याला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.

'Madhab' at the base of Chamarlane in Nashik | नाशकात चामरलेण्याच्या पायथ्याशी रंगला ‘मडबाथ’

नाशकात चामरलेण्याच्या पायथ्याशी रंगला ‘मडबाथ’

Next
ठळक मुद्देनाशिकात रंगला मडबाथचा उत्सव अंगाला चिखल लावून स्नानाचा लूटला आनंद संगीताच्या तालावर युवकांनी धरला ठेका

नाशिक : चामरलेण्याच्या पायथ्याच्या परिसरात सालाबादप्रमाणे मडबाथचा आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आस्वाद घेतला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या  जाणाऱ्याला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.
नाशिकमध्ये गेल्या गेल्या २१ वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागांतील आणि नाशिक महानगरातील सुमारे हजारो लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. हनुमानजयंतीनंतर येणाºया पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. वारुळाची माती गोळा करून आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ही माती लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते. सकाळी ६ वाजेपासून येथे मडबाथला सुरुवात झाल्यानंतर बघता बघता येथे आलेल्या लोकांनी स्वत:च्या अंगाला चिखल फासून एक तास उन्हात चिखल वाळल्यानंतर मडबाथचा आनंद लुटला. महेश शहा, चिराग शहा तसेच योग गुरू नंदू देसाई यांनी यांच्यातर्फे या मडबाथचे आयोजन करण्यात आले होते.  

Web Title: 'Madhab' at the base of Chamarlane in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.